Iran Israel War: इस्रायलच्या मोसाद मुख्यालयावर इराणचा हल्ला, पत्त्यासारखी कोसळली इमारत

  198

लष्करी गुप्तचर इमारतीलाही केले लक्ष्य


तेल अविव: इस्रायल आणि इराणमधील संघर्ष (Iran Israel War) पाचव्या दिवशीही सुरू आहे. किंबहुना हा संघर्ष आता विकोपाला पोहोचला असल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्हीही देश एकमेकांच्या जिवावर उठले असल्यासारखा हल्ल्यांवर हल्ले करत आहे. या संबंधित आणखीन एक मोठी माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये इराणने इस्रायलच्या मोसाद मुख्यालयावर बेलिस्टिक क्षेपणास्त्र डागले.  इस्त्रायलची राजधानी तेल अव्हीवमध्ये मोसादचे हे मुख्य कार्यालय आहे. याच कार्यालयावर हा हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हल्ल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.


मंगळवारी, इराणने तेल अवीव येथील इस्रायलच्या गुप्तचर संस्थेच्या मोसादच्या मुख्यालयावर हवाई हल्ला केला आहे. याशिवाय लष्करी गुप्तचर संस्थेशी संबंधित अमान या गुप्तचर संस्थेच्या इमारतीलाही लक्ष्य करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.



मध्यपूर्वेतील राजकीय तापमान वाढले


इस्रायलने इराणवर हल्ला केल्यापासून मध्यपूर्वेतील राजकीय तापमान वाढले आहे. इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने प्रत्युत्तर दिले आहे आणि अनेक इस्रायली शहरे उध्वस्त केली आहेत. इराणच्या ड्रोन हल्ल्यामुळे नेतन्याहूच्या देशात मोठ्या प्रमाणात विनाश झाला आहे. अनेक लष्करी तळ उद्ध्वस्त झाले आहेत, गुरियन विमानतळ उद्ध्वस्त झाले आहे.  इराणने इस्रायलच्या संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयावरही क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत, ज्यामुळे ही सर्व प्रमुख ठिकाणे उद्ध्वस्त झाली आहेत. ज्यात आता इराणने जगातले सर्वात भयानक आणि आक्रमक मानली जाणारी इस्रायलची गुप्तचर संस्था  मोसादचे मुख्यालयही अगदी पत्त्यांप्रमाणे उडवून दिलं आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.





इराण आणि इस्रायल युद्धाचा परिणाम जगावर


इराण आणि इस्रायलमधील युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. अमेरिका वगळता संपूर्ण जगाचे नेते हे युद्ध थांबवण्याची मागणी करत आहेत, परंतु इस्रायल आपल्या भूमिकेवर ठाम आहे. इराणचे म्हणणे आहे की जोपर्यंत इस्रायल आपले हल्ले थांबवत नाही तोपर्यंत ते इराणवर हल्ला करत राहतील.



काय आहे संपूर्ण प्रकरण?


इस्रायलने इराणच्या अणुस्थळावर हल्ला करताना तेहरानमधील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी एअर स्ट्राइक केले, या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च लष्करी अधिकारी मेजर जनरल अली शादमानी यांचा मृत्यू झाला आहे. शादमानी हे इराणच्या खातम-अल-अंबिया मुख्यालयाचे म्हणजेच लष्करी आपत्कालीन कमांडचे प्रमुख होते. इस्रायली हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मेजर जनरल गुलाम अली रशीद यांच्या जागी त्यांना ही जबाबदारी देण्यात आली होती. रशीद यांचे गेल्या शुक्रवारी निधन झाले होते. शादमानी यांनी केवळ ४ दिवसांपूर्वीच हे पद स्वीकारले होते.  इतकेच नव्हे तर या हल्ल्यात  अणुशास्त्रज्ञांसह शेकडो नागरिकांचा मृत्यूदेखील झाला. तर १२०० हून अधिक लोक जखमी झाले. इस्रायलच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करण्यास सुरुवात केली. ज्यामुळे इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात विनाश झालेला दिसून येत आहे.  या संघर्षात इस्रायली हल्ल्यात आतापर्यंत २२४ इराणी नागरिक ठार झाले आहेत, तर १,४८१ जण जखमी झाले आहेत. त्याच वेळी, इस्रायलमध्ये आतापर्यंत २४ जण ठार झाले आहेत, तर ६०० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

Comments
Add Comment

येमेनजवळ मोठी दुर्घटना, आफ्रिकन स्थलांतरितांची बोट बुडाली, ६० हून अधिक जणांचा मृत्यू

सना, येमेन: येमेनच्या किनाऱ्यावर रविवारी एक भीषण बोट दुर्घटना घडली, ज्यात ६० हून अधिक आफ्रिकन स्थलांतरितांचा

भूकंपानंतर आता रशियात ज्वालामुखीचा उद्रेक! राखेचे लोट ६,००० मीटर उंचीपर्यंत

मॉस्को: रशियाच्या कामचटका प्रांतातील Petropavlovsk येथे ८.८ तिव्रतेचा भीषण भूकंप झाल्यानंतर आता याच ठिकाणी ज्वालामुखीचा

पाकिस्तानात ५.१ रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप

इस्लामाबाद: पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये रविवारी (३ ऑगस्ट) भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. पाकिस्तानच्या नॅशनल

'भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही...' डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आता रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे थांबवू शकतो,

२५% ट्रम्प टॅरिफचा धोका टळला! एक आठवड्यासाठी दिलासा

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारतावर २५ टक्के टॅरिफची घोषणा केली होती, जी १

ट्रम्प यांनी ४१ टक्क्यांपर्यंत लावला टॅरिफ, आदेशावर केली स्वाक्षरी, भारतासह ७० देशांवर होणार परिणाम

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोठा निर्णय घेताना यांनी अनेक देशांच्या वस्तूंवर १० ते ४१