Friday, October 24, 2025
Happy Diwali

Horoscope: जुलैमध्ये शुक्र ३ वेळा करणार राशी परिवर्तन, या राशींना होणार लाभ

Horoscope: जुलैमध्ये शुक्र ३ वेळा करणार राशी परिवर्तन, या राशींना होणार लाभ
मुंबई: ज्योतिषशास्त्रात जेव्हा एखाद्या ग्रहाचे गोचर होते. तेव्हा त्याचा परिणाम सरळ आपल्या जीवनावर होतो. त्याच पद्धतीने शुक्रचे गोचरही महत्त्वाचे असते. खरंतर, जुलै महिन्यात शुक्र तीन वेळा चाल बदलणार आहेत. शुक्र ८ जुलैला दुपारी ४.३१ मिनिटांनी रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. त्यानंतर २० जुलैला दुपारी १.०२ मिनिटांनी मृग नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. त्यानंतर महिन्याच्या अखेरीस २६ जुलैला सकाळी ९.०२ मिनिटांनी मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत. शुक्रला सुख-समृद्धी, धन-दौलतचे कारक मानले जाते. असेही मानले जाते की ज्याच्यावर शुक्राची कृपा राहते त्या व्यक्तीवर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहतो.

सिंह

जुलैमध्ये शुक्रचे गोचर सिंह राशीच्या लोकांसाठी काही गुड न्यूज मिळू शकते. घरातील तणाव संपू शकतात. आरोग्य चांगले राहील. सोबतच प्रत्येक कामात यश मिळेल. सिंह राशीच्या लोकांचे कुटुंबियांशी संबंध मजबूत होतील. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी मिळेल. पैशाशी संबंधित समस्या संपतील.

तूळ

शुक्रचे ३ वेळा चाल बदलणे तूळ राशीच्या लोकांसाठी चांगले मानले जात आहे. यामुळे मानसिक ताणातून सुटका मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची साथ लाभेल. नोकरी करणाऱ्या लोकांची पगारवाढ होऊ शकते.

धनू

शुक्रच्या बदलत्या चालीमुळे धनू राशीच्या लोकांना बिझनेसमध्ये फायदा होईल. जीवनात अनेक आनंदाच्या बातम्या मिळतील. फायनान्सची स्थिती चांगली राहील. शेअर मार्केटमधून लाभ होऊ शकतात.
Comments
Add Comment