
२२ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत १०५ रूपयांनी घसरून आज ९२०० रुपयांवर पोहोचली आहे तर २२ कॅरेट प्रति तोळा किंमत १०५० रूपयांनी घसरुन ९२००० रूपयांवर पोहोचली आहे. १८ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ८६ रुपयांनी घसरून ७५२८ रुप यांवर पोहोचले आहे तर १८ कॅरेट प्रति तोळा किंमत ८६० रुपयांनी घसरून ७५२८० रूपयांवर पोहोचली आहे.
भारतीय कमोडिटी बाजाराय म्हणजेच एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) वर सोन्याच्या निर्देशांकात घसरण आज किरकोळ ०.०२% वाढ होत निर्देशांक पातळी ९९२०० रूपयांवर पोहोचली आहे. जागतिक बाजारपेठेत गोल्ड फ्युचर निर्देशांक (Gold Future Index) यामध्ये ०.१८ % घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील मुख्य लक्ष क्रूड तेलाकडे केंद्रित झाले आहे. दुसरीकडे गेल्या दोन आठवड्यात सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्याने बाजारातील सोन्याच्या मागणीत घट झाली. सोन्याला पर्याय म्हणून चांदीच्या दरात देखील वाढ झाली होती.
चांदीच्या दरात किरकोळ वाढ!
चांदीच्या दरात गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या घसरणीचा स्तर कायम राहिला होता. मात्र काल चांदीच्या दरात कुठलाही बदल झालेला नव्हता. आजही चांदीच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. सोन्याला पर्याय व औद्योगिक वापरा त चांदीचा मोठ्या प्रमाणात वापर या कारणांमुळे चांदीच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. आज चांदीच्या दरात प्रति ग्रॅम किंमत ०.१०% वाढ होऊन दर पातळी ११० रूपयांवर पोहोचली आहे तर प्रति किलो किंमत १०० रुपयांनी वाढत ११०००० रूपयांवर पोहोचली आहे. एमसीएक्सवर चांदीच्या निर्देशांकात ०.३४% वाढ झाल्याने चां दीची पातळी १०६९२५.०० रूपयांवर पोहोचली आहे. जागतिक अनिश्चिततेमध्ये स्थिरता शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी सोने ही एक नेहमीच गुंतवणूकीची संधी असते.जी भू-राजकीय जोखमींपासून बचाव म्हणून त्याचे महत्त्व अधोरेखित करते.