
काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने बेटिंग अँपवर बंदी घातली होती, परंतू अनेक मोठ्या बॉलिवूड कलाकार आणि क्रिकेटर यांच्याकडून बंदी घातलेल्या प्लॅटफाॅर्मला का प्रमोट केलं जातं आहे, असा सवाल ईडीने चौकशी दरम्यान केला. या संदर्भात माजी क्रिकेटपटू आणि बॉलिवूड कलाकरांवर ईडीची कारवाई केली जात आहे.
अलिकडेच, कोलकत्ता येथे अमलबजावणी संचालयाने मनी लाँर्डिंग कायद्यांतर्गत एका मोठ्या ऑनलाईन बेटिंग आणि मनी लाँर्डिंग रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी, पश्चिम बंगालसह दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश आणि आसाममध्ये पसरलेल्या अनेक ठिकाणी शोध मोहिम राबवण्यात आली. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जप्त करण्यात आली...
या प्रकरणात 766 बँकेद्वारे पैशांचा व्यवहार करण्यात आला आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली . त्यामुळे ईडीने 16 डेबिट आणि क्रेडिट कार्ड लॉक केलेली आहेत. अशी माहिती समोर आली. ईडीने विशाल भारद्वाज आणि सोनू ठाकूर यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना दहा दिवसांची ईडी कोठडीत पाठवले आहे. या कारवाई दरम्यान इडीने 3 कोटी 29 लाख रक्कम जमा केली आहे.
महादेव ऑनलाईन बेटिंग प्रकरणात ईडीने एप्रिल महिन्यात कारवाई केली होती. या प्रकरणात ५१७ कोटी रुपयांची मालमत्ता इडीने जप्त केली...