Air India Plane Crash Another Video: अहमदाबाद विमान अपघातातील हृदयाचा ठोका चुकवणारा आणखीन एक व्हिडिओ आला बाहेर

बापरे! जीव वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या 


अहमदाबाद: गुजरात येथील अहमदाबाद विमान अपघाताची भीषणता आणि या अपघातात मरण पावलेल्या लोकांच्या नातेवाईकांचा आक्रोश हे सर्वकाही काळीज पिळवटून टाकणारे आहे. विमान अपघातानंतर उठलेला आगडोंब, आणि विमान ज्या परिसरात कोसळले त्या ठिकाणचे भयावह दृश्य सोशल मिडियाच्या माध्यमातून संपूर्ण जगाने पाहिले. आता याच घटनेचा आणखीन एक नवा व्हिडिओ समोर आला आहे, या व्हिडिओमध्ये, एअर इंडियाचे विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून उड्या मारायला सुरुवात केल्याचे दिसून येते. आपला जीव वाचवण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी टाकलेल्या या उड्या हृदयाचा ठोका चुकवत आहे. 


एअर इंडियाच्या विमान अपघातानंतरचा आणखीन एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये विमान अपघातानंतर जवळच्या वसतिगृहात राहणारे विद्यार्थी स्वतःला कसे वाचवत आहेत हे दिसून येते.


अहमदाबाद विमान आपघातातील हृदयाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ पहा  



 

बीजे मेडिकल कॉलेज हॉस्टेलच्या इमारतीला धडकले विमान 


१२ जून रोजी गुजरातमधील अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळले. अहमदाबाद विमानतळाजवळील बीजे मेडिकल कॉलेज हॉस्टेलच्या इमारतीवर हे विमान कोसळले. या विमानात २४१ लोक होते, त्यापैकी २४० जणांचा मृत्यू झाला. विमान हॉस्टेलच्या इमारतीला धडकल्याने, या इमारतीत राहणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचा देखील या अपघातात बळी गेला आहे. यात अनेक विद्यार्थी गंभीरपणे जखमी झाले. यादरम्यान अनेकांनी आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले. ज्यात काहीनी इमारतीमधून उड्या देखीक टाकल्या. या घटनेचा एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्यांना काटा आणतो.



काय आहे या व्हिडिओमध्ये?


या व्हिडिओमध्ये एमबीबीएसचे विद्यार्थी दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरून कापड बांधून कसे खाली उतरण्याचा प्रयत्न करत आहेत हे दिसून येते. हे विद्यार्थी बेडशीटच्या मदतीने खाली उतरण्याचा  प्रयत्न करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये हॉस्टेलसमोर आगीचे लोळ दिसत आहेत तर लोक भीतीमुळे ओरडताना देखील ऐकू येत आहेत. काही विद्यार्थी बेडशीटपासून दोरी बनवताना दिसत आहेत तर काहीजण या चादरी वापरून रेलिंगवरून खाली उड्या मारताना दिसत आहेत जेणेकरून त्यांचे प्राण वाचतील.


१२ जून रोजी अहमदाबादहून लंडनच्या गॅटविक विमानतळावर जाणारे एअर इंडियाचे विमान एआय १७१ टेकऑफनंतर काही वेळातच कोसळले. पडण्यापूर्वी विमान एका हॉस्टेलच्या इमारतीला धडकले, ज्यामुळे हॉस्टेलच्या इमारतीचे तसेच आजूबाजूच्या इमारतींचे मोठे नुकसान झाले. एअर इंडियाच्या या विमानात २४१ लोक होते, ज्यात २३० प्रवासी, दोन पायलट आणि १० क्रू मेंबर्स होते. यापैकी २४० जणांचा मृत्यू झाला. भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक रमेश विश्वास कुमार हे विमानातील एकमेव व्यक्ती आहेत जे वाचले.

Comments
Add Comment

पंतप्रधान मोदी मिझोरम, मणिपूर, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहार या पाच राज्यांच्या तीन दिवसीय दौऱ्यावर

मिझोरम, मणिपूर आणि आसाममध्ये ३५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रकल्पांचे उद्घाटन करणार प. बंगाल आणि बिहारमध्ये

पंतप्रधान मोदींचा आज मणिपूर दौरा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरला भेट देणार आहेत, जिथे ते अनेक प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि एका

सावधान! आरोग्य मंत्रालयाचे सर्व राज्यांना अलर्ट जारी; मोठं संकट येणार की साथरोग?

पुरामुळे वाढतेय साथरोगाची भीती: आरोग्य मंत्रालयाचा सर्व राज्यांना 'हाय अलर्ट' जारी, डेंग्यू आणि मलेरियाचा धोका

माधुरी हत्ती प्रकरण : कोल्हापूरला पाठवण्यावर तुर्तास निर्णय नाही

प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे वर्ग करण्याबाबत सर्वांचे एकमत नवी दिल्ली : कोल्हापूर

Nepal News : भारतीय पर्यटकांवर नेपाळमध्ये हल्ला; प्रवाशांचे मोबाईल-रोख रक्कम लुटली अन् सर्वांना तातडीनं...

काठमांडू : नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण मिळालंय. गेल्या काही

सी. पी. राधाकृष्णन झाले भारताचे १५ वे उपराष्ट्रपती, राष्ट्रपतींनी दिली शपथ

नवी दिल्ली : भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांनी शपथ घेतली. दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे