
#WATCH | #AirIndiaPlaneCrash | Maharashtra: Father of Captain Sumeet Sabharwal, Pushkaraj pays emotional tribute to his son outside their residence in Powai, Mumbai.
Captain Sabharwal was flying the ill-fated London-bound Air India flight that crashed soon after take off in… pic.twitter.com/NStRiMM6BY
— ANI (@ANI) June 17, 2025
#WATCH | Jaipur, Rajasthan: Lt Colonel Deepika Chauhan bids a tearful goodbye to her husband, Lt Colonel Rajveer Singh Chauhan (Retd), who was the pilot of the helicopter that crashed in Kedarnath, Uttarakhand, on June 15.
The retired Lt Colonel & 6 others died in the crash. pic.twitter.com/HW0yBfwF4N
— ANI (@ANI) June 17, 2025
मुंबईत एअर इंडियाचे वैमानिक कॅप्टन सुमित सभरवाल यांना त्यांच्या वृद्ध वडिलांनी पुष्करराज यांनी पवईच्या घरी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. ज्या वयात मुलाचा आधार घेऊन जगावे असे वाटते त्या वयात मुलाच्या मृतदेहाचे अंत्यदर्शन घेण्याची वेळ पुष्करराज यांच्यावर आली. बराच वेळ पुष्करराज हात जोडून शांत उभे होते. अखेर त्यांना अश्रू आवरणे कठीण झाले. ते रडण्यापासून स्वतःला रोखू शकले नाही. मुंबईत असे शोकाकूल वातावरण असताना जयपूरमध्ये लेफ्टनंट कर्नल दीपिका चौहान त्यांचे पती, लेफ्टनंट कर्नल राजवीर सिंग चौहान (निवृत्त) यांना साश्रूपूर्ण नयनांनी निरोप देत होत्या. राजवीर सिंग हे १५ जून रोजी उत्तराखंडमधील केदारनाथ येथे कोसळलेल्या हेलिकॉप्टरचे पायलट होते.
मुंबईत झाले अंत्यसंस्कार
कॅप्टन सुमित सभरवाल यांचे पार्थिव एका शवपेटीत ठेवण्यात आले आणि सकाळी विमानाने मुंबई विमानतळावर आणण्यात आले. कुटुंबीयांनी कॅप्टन सभरवाल यांचे पार्थिव पवई येथील जल वायु विहार येथील त्यांच्या निवासस्थानी नेले. त्यांचे पार्थिव तासभर घरी ठेवण्यात आले नंतर चकाला येथे विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
जुळ्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी लेफ्टनंट कर्नलवर येऊन पडली
रविवारी उत्तराखंडमधील केदारनाथ येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेले जयपूरचे रहिवासी पायलट राजवीर सिंग चौहान यांनी भारतीय सैन्यात १५ वर्षांहून अधिक काळ सेवा बजावली आणि विविध भूप्रदेशांमध्ये उड्डाण मोहिमांचा त्यांना व्यापक अनुभव होता. रविवारी केदारनाथजवळ एका खासगी कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळले आणि पायलट चौहानसह सात जणांचा मृत्यू झाला. आता राजवीर यांच्या पत्नी लेफ्टनंट कर्नल दीपिका चौहान यांच्यावर एकटीने जुळ्या मुलांचे संगोपन करण्याची वेळ आली आहे. चारच महिन्यांपूर्वी चौहान दांपत्याला जुळी मुले झाली होती.