Sunday, October 26, 2025
Happy Diwali

परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारने अखेर सोडल मौन

परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारने अखेर सोडल मौन

मुंबई : अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी या तिकडीने 'हेरा फेरी' सिनेमातून प्रेक्षकांना खळखळून हसवलं.आता चाहत्यांचं 'हेरा फेरी ३'कडे लक्ष लागलं आहे.मात्र परेश रावल यांनी सिनेमा सोडल्याने सर्वांना धक्का बसला आहे.

त्यांच्या बाबुराव आपटे भूमिकेची जादू आजही कायम आहे. परेश रावल यांनी सिनेमा सोडल्यानंतर बराच वाद झाला. अक्षयने त्यांच्यावर नुकसान भरपाईचा दावा केला. या सर्व प्रकरणावर आता अक्षयने मौन सोडलं आहे.

एका मुलाखतीत अक्षय कुमारला 'हेरा फेरी ३'वर प्रश्न विचारण्यात आला. सिनेमा नक्की येणार आहे का? नक्की काय घडतंय? यावर तो म्हणाला, ""जे घडतंय ते तुमच्यासमोरच घडतंय. तुम्हा माध्यमांना सगळं माहितच आहे. सगळं काही ठीक व्हावं अशीच माझीही आशा आहे. मला खात्री आहे की सगळं चांगलं होईल.

दरम्यान, परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' मानधनाच्या कारणामुळे सिनेमा सोडला का? अशी शक्यता व्यक्त केली जात होती. यावर परेश रावल म्हणाले, "प्रेक्षकांच्या प्रेमाची तुलना पैशांसोबत होऊच शकत नाही. सध्या मला ही भूमिका करायची नाही इतकंच यामागचं कारण आहे. दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी मला समजवण्याचा प्रयत्न केला पण मला खरोखरंच या घडीला ही भूमिका साकारायची इच्छा नाही असंच मी त्यांना सांगितलं. आम्ही सोबत अनेक सुपरहिट सिनेमे केले आहेत आणि यापुढेही करु. आमच्यात कोणतेच मतभेद नाहीत आणि होणारही नाहीत."

Comments
Add Comment