रत्नागिरी : राज्यात अनेक ठिकाणी शालेय शिक्षण विभागाचा आढावा पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला. शिक्षण क्षेत्रातील काही अधिकाऱ्यांना उदय सामंतानी चांगलंच धारेवर धरलं. जिल्हातील 5 हजार 830 शिक्षकांपैकी किती शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी नवीन उपक्रम राबवले आहेत ? पंतप्रधान अंतर्गत निधीतून काय काम केली ? विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी कोणते उपक्रम राबवले आहेत ? यांसारखे अनेक प्रश्न विचारुन उदय सामंत यांनी शिक्षकांची चांगली शाळा घेतली.
तसेच उदय सामंत यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला, रत्नागिरी येथील वाडा याठिकाणी शिक्षकांने विश्रांतीगृह सुरु केले आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला झोप आली. तर वडिलांप्रमाणे विद्यार्थ्याला झोपवलं जातं विद्यार्थी झोपेतून जागा झाल्यानंतर पुन्हा शिकवलं जातं. सामाजिक कार्य म्हणून 365 दिवस विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम शिक्षक करत असतात. तसेच काही शिक्षक विद्यार्थ्यांना बागेत खेळता यावं यासाठी बाग तयार करतात.काही शाळेतील विद्यार्थी इंग्रजी आणि मराठी एकाच वेळी लिहितात. अशा शिक्षकांचं मार्गदर्शन ठेवायला हव, अशी सुचना उदय सामंत यांनी केली...
तसेच उदय सामंत यांनी पंतप्रधान योजने अंतर्गत खर्च करण्यात आलेल्या शाळांना अहवाल देखील मागवला. यामध्ये काही गैरप्रकार आढळला तर त्यांच्यावरती फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
शालेय पोषणा संदर्भात अँप तयार करण्यात यावे. विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यात यावी. ज्या शाळेत पटसंख्या वाढवलेली आहे. त्या शाळेची माहिती गावागावत जाऊन सांगावी. अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.