माणगावमध्ये लोकवस्तीनजीक आढळून आले मगरीचे घरटे

  51

वनविभागामार्फत त्वरित घरट्याला देण्यात आले संरक्षण


माणगाव : माणगांव तालुक्यात काळ नदीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मगरींचे वास्तव्य आहे, काळ नदीकिनारी त्यांना मुबलक नैसर्गिक अधिवास आहे, माणगांव शहर हे पूर्वी छोटे गाव होते त्याची आता व्याप्ती वाढलेली आहे त्यामुळे जवळील वन्यजीवांच्या नैसर्गिक निवासस्थानांवर परिणाम होत असल्याचा दिसून येत आहे, परिणामतः हे वन्यजीव व ह्या मगरी शहरामध्ये मानववस्तीनजीक दिसून येत आहेत, गेल्यावर्षीदेखील शहराच्या मध्यभागातुन मोठ्या मगरीला रेस्क्यू करण्यात आलेले होते.



खांदाड गावात सोनभैरव मंदिर परिसरात काळ नदीकिनारी एका मगरीचे घरटे आढळून आले आहे, येथे मगरीची अनेक पिल्ले दिसून येत आहेत, खबरदारी म्हणून माणगांव वनविभागाने तत्परतेने त्वरित योग्य ती कारवाई करून ह्या मगरीचे घरटे येथे सुरक्षित केले आहे जेणेकरून ह्या मगरीला व तिच्या पिल्लांना कोणतीही इजा पोहोचणार नाही, व मोठ्या मगरीपासून पिल्लांच्या बचावाकरिता देखील, कोणत्याही नागरिकांवर मगरीच्या हल्ला होणार नाही व कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे, सदरचा परिसर वनविभागाकडून त्वरित निषिद्ध करण्यात आला आहे. सदरचे मगरीचे घरटे सुरक्षित करण्याकरिता माणगांव वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत शिंदे, व वनपाल ज्ञानदेव सुभेदार यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक पवन चौधरी व वनमजूर गणेश शिर्के, सुनिल तोंडलेकर, अनिल पवार, रुपेश हिलम व बाळू जाधव यांनी योग्य ती कार्यवाही केली आहे.


सद्याच्या पावसाच्या दिवसांमध्ये आता ह्या मगरी नदीला येत असणाऱ्या मोठ्या पुरामुळे प्रवाहात वरती छोट्या ओढ्यामध्ये व शेतांमध्ये घुसण्याची शक्यता असते, त्यामुळे नदीकिनारील नागरिकांनी भयभीत न होता तसेच मगर पाहण्यासाठी गर्दी ना करता, मगरींना कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता वनविभागाकडे किंवा स्थानिक बचावपथकांकडे त्वरित संपर्क साधावा असे आवाहन माणगावचे वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांच्याकडून करण्यात आले आहे.


नदीकिनारील नागरिकांनी पावसाळ्यात खबरदारी घ्यावी, पूरपरिस्थितींमुळे, मगरी-साप तसेच इतर वन्यजीव मानववस्तीनजीक आसरा घेण्यासाठी येऊ शकतात, नागरिकांना खबरदारी घेऊन त्वरित वनविभागाकडे संपर्क साधावा, वनविभाग वन्यजीव व नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी ‘एआय’चा वापर

वाहनांवर काटेकोर लक्ष रायगड : गणेशोत्सव काळात मुंबई–गोवा महामार्गावर लाखो कोकणवासीय आपल्या गावांकडे धाव घेतात.

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

माणगावमध्ये वाहतूककोंडी, ठिकठिकाणी पोलिस तैनात

मुंबईमधून गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली

गणपतीला कोकणात जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकांवर गर्दी

आज रविवार असल्याने गणपतीला कोकणात जाण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील विविध ठिकाणाहून

नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होईना, इच्छुकांची कोंडी सोडवेना

माथेरान : माथेरान नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत यावेळीसुद्धा नगराध्यक्षपदाची निवडणूक ही थेट जनतेच्या

पनवेल-चिपळूणदरम्यान 6 अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या

कोकणात जाण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे गाड्यांमध्ये वाढणारी भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन भाविक