Sunday, October 26, 2025
Happy Diwali

उत्तरप्रदेश : फटाका कारखाना स्फोटात ५ महिलांचा मृत्यू

उत्तरप्रदेश : फटाका कारखाना स्फोटात ५ महिलांचा मृत्यू

अमरोहा : उत्तरप्रदेशच्या अमरोहा येथे एका फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. यामध्ये ५ महिलांचा मृत्यू झाला असून १२ जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती पुढे आलीय.

अमरोहा येथील त्रासी गावापासून २ किलोमीटर अंतरावर जंगलात फटाक्यांचा कारखाना चालवला जात होता. कारखान्यात सुमारे २५ पुरुष आणि महिला काम करत होते. यादरम्यान, एका कामगाराच्या मुलाने फटाके पेटवले. त्यानंतर, जवळच ठेवलेले फटाके आणि गनपावडरला आग लागली. सुमारे १५ मिनिटे हे स्फोट सुरू राहिले.

स्फोटानंतर कारखान्याचा ढिगारा 300 मीटरपर्यंत पसरला. अनेक कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले. स्फोटाचा आवाज आणि धुराचे लोट ऐकून ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. लोकांनी पोलिसांना माहिती दिली. जिल्हा प्रशासन, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथके घटनास्थळी पोहोचली. ढिगाऱ्याखाली गाडलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी काम सुरू झाले. जिल्हाधिकारी निधी गुप्ता आणि एसपी अमित कुमार आनंद घटनास्थळी पोहचल्यात.

Comments
Add Comment