School Reopens: महापालिकेच्या शाळा आजपासून सुरू

आयुक्त भूषण गगराणी करणार विद्यार्थ्यांचे स्वागत


मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या सर्व माध्यमांच्या शाळा आजपासून पासून सुरू होत आहेत. महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. तर महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी बोरिवली (पश्चिम) येथील पोईसर महानगरपालिका शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. उन्हाळी सुट्टी संपून सोमवार, १६ जूनपासून सर्व शाळा सुरू होत आहेत.


मुंबई महापालिकेच्या सर्व माध्यमांच्या शाळाही सोमवारपासून सुरू होत आहेत. शाळेत पहिल्या दिवशी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. बोरिवली येथील शाळेत पालिका आयुक्त भूषण गगराणी हे स्वतः उपस्थित राहून विद्याथ्यांचे स्वागत करणार आहेत. त्याचबरोबर बंदा शाळेच्या पहिल्याच दिवशीच महापालिकेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटपही करण्यात येणार आहे. पोयसर महापालिका शाळेत गगराणी यांच्या हस्ते विद्याथ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.


मुंबई महानगरपालिकेने विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी, तसेच त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी २००७-८ या शैक्षणिक वर्षापासून मोफत शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. मात्र अनेकवेळा शालोपयोगी साहित्याच्या खरेदीला विलंब झाल्यामुळे निम्मे वर्ष उलटून गेले तरी विद्यार्थ्यांना या वस्तू मिळत नव्हत्या. मात्र गेल्या काही वर्षांपासून शिक्षण विभागाने नियोजन करून खरेदीचे वेळापत्रक जुळवून पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना वस्तू मिळतील याकरीता प्रयत्न केले.


महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने यंदा एप्रिल महिन्यातच शालोपयोगी साहित्याची खरेदी प्रक्रिया पूर्ण केली. उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर यांच्या देखरेखीखाली प्रत्येक शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना हे साहित्य वितरित केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालोपयोगी साहित्यामध्ये गणवेश, वह्या, कंपासपेटी, चित्रकलेसाठी आवश्यक साहित्य, पेन्सिल, पाण्याची बाटली, डबा, दप्तर, बूट, सॅण्डल, मोजे आदी वस्तूंचा समावेश आहे. यासह इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांकरिता शालेय वेळेत अभ्यासासाठी आधुनिक टेंबही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती