Saturday, October 25, 2025
Happy Diwali

भाजपाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी दाखला शिबीर

भाजपाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी दाखला शिबीर

विद्यार्थ्यांना विविध राेपांचे केले वाटप

विरार : दहावी व बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे दाखले एकाच छताखाली उपलब्ध व्हावे यासाठी भारतीय जनता पक्षाद्वारे अभिनव उपक्रम राबविण्यात आला. वसई तहसील कार्यालयाकडील उत्पन्न दाखले, अधिवास दाखले, क्रिमिलेअर दाखले, ज्येष्ठ नागरिक दाखले, रेशनकार्ड ऑनलाइन करून घेणे अशा विविध कामकाजाचे शिबीर कातकरीपाडा, चंदनसार येथील जिल्हा परिषद प्राथमिक रुग्णालय येथे शनिवारी घेण्यात आले.

या शिबिराला नालासोपारा विधानसभेचे आमदार राजन नाईक उपस्थित होते. यावेळी आमदार नाईक यांनी वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना व अंगणवाडी सेविकांना वृक्ष वाटप केले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी नारायण मांजरेकर, विरार पूर्व उत्तर मंडळ अध्यक्ष वैभव झगडे, विरार पूर्व मंडळाचे अध्यक्ष मिलिंद वैद्य, महामंत्री महेश पटेल, महेश कदम, सुनीता पाटील, सागर विचारे, दुर्गेश पाटील, आशू पाटील, अक्षय मस्के, हरीकेश कनोजिया, निलेश घरत, किरण किनी, राजू राव, आदित्य माने, वंश जाधव, प्रदीप मोरे, ज्योती मोरे, राजीव मांजरेकर, विनोदकुमार गुप्ता, अजय सहानी, सुलतान इद्रीशी, नईम ईद्रीशी, आम्रपाली खैरनार, भाग्यश्री पाध्ये, रंजना इंगळे, उषा खरे, अरुणा खरे, सुवर्णा जगताप इ. कार्यकर्ते उपस्थित होते.

सदरच्या शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे प्राध्यापक डी. एन. खरे यांनी सांगितले तसेच यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र चंदनसार येथील आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब जाधव यांचे विशेष आभार त्यांनी मानले.

Comments
Add Comment