Ex Dividend : आजच्या या कॉर्पोरेट अँक्शन ! कमवायचे असतील तर 'या' शेअर्सची आज अंतिम मुदत! हनिवेल तर प्रति शेअर १०५ रूपयांचा Dividend देणार !

प्रतिनिधी: आज लाभांश मिळण्याच्या दृष्टीने आजचा दिवस महत्वाचा आहे. गुंतवणूकदारांना आज चांगल्या लाभांश गुंतवणूकीसाठी शेवटची संधी आहे. आज बजाज फायनान्स, टाटा टेक, हनिवेल ऑटोमेशन या कंपन्यावर चांगला परतावा मिळवण्याची नामी संधी आहे. यांच्या व्यवहारातील लाभासाठी आज अंतिम मुदत असेल.


काय आहेत बाजारातील महत्वाच्या हालचाली -


१) बजाज फायनान्स (Bajaj Finance) - बजाज फायनान्स कंपनी आपल्या गुंतवणूकदारांचे शेअर्स विभागणार (Split) करणार असल्याने भागभांडवल धारकांच्या शेअर्स दुप्पट होणार आहेत. ४:१ गुणोत्तर (Ratio) सह कंपनी एका शेअर्सला चार बोनस शेअर्स देय आहे. प्रत्येक शेअर्सच्या दर्शनी मूल्य (Face Value) दोन रुपयावरून १ रूपया होणार आहे. त्यामुळे आज आपल्या पोर्टफोलिओत वाढ करायची गुंतवणूकदारांना शेवटची संधी आहे आजच या सुविधेचा लाभ घेण्यासाठी अंतिम मुदत आहे.


२) टाटा टेक्नॉलॉजी (Tata Technology) - टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने आज दोन एक्स पेआऊट डिवीडंट (Ex Payout Dividend) देणार आहे. त्यासाठी आज अंतिम मुदत असेल. कंपनीने प्रति शेअर्स ८.३५ रूपये लाभांश (Dividend) जाहीर केला आहे. याशिवाय कंपनी प्रत्येक शेअर्समागे ३.३५ प्रति शेअर देणार आहे.


३) LKP Securities - एलकेपी सिक्युरिटीजने अंतिम लाभांश जाहीर केला आहे. ०.३ रूपये प्रति शेअर इतका पेआऊट ते देणार आहे.


४) हनीवेल ऑटोमेशन इंडिया (Honeywell Automation India)- हनीवेल कंपनीने तर प्रति शेअर तब्बल १०५ रूपये लाभांश जाहीर केला आहे. आजपर्यंत जे या कंपनीचे गुंतवणूकदार असतील त्यांनाच हा लाभ होऊ शकतो. आज अंतिम मुदत आहे उद्या शेअर खरेदी केल्यास त्याचा लाभ संबंधित गुंतवणूकदारांना होणार नाही.

Comments
Add Comment

शाळेच्या व्हॅनमध्ये चालकाकडून चिमुरडीवर अत्याचार

बदलापूर : काही महिन्यांपूर्वी शाळेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना बदलापूरमध्ये घडली होती. आता

महालक्ष्‍मी येथील उड्डाणपुलाचे काम ५५ टक्के पूर्ण

अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांच्‍याकडून स्‍थळ पाहणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महालक्ष्‍मी

अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर

वॉशिंग्टन डीसी : अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडली आहे. जानेवारी २०२५ मध्येच ट्रम्प प्रशासनाने जागतिक

जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी तब्बल ७ हजार ६९५ अर्ज

पंचायत समितीच्या निवडणुकीतही चुरस; १ हजार ४६२ जागांसाठी १३ हजार उमेदवार रिंगणात मुंबई : महापालिका निवडणुकीचा

महापौरपदासाठी भाजपमधील केरकर,शिरवडकर,कोळी, सातम, गंभीर, तावडे यांच्या नावाची चर्चा

मुंबई : मुंबईच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्ग करता आरक्षित झाला आहे. मुंबई महापालिकेत भाजपा शिवसेना

राज ठाकरेंच्या परवानगीनेच शिवसेना आणि मनसेत युती

उबाठाचा दावा ठरला फोल; ठाकरे बंधूंच्या एकीवरही प्रश्नचिन्ह मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेत