
प्रतिनिधी: उद्यापासून एपेलटोन इंजिनियर्स लिमिटेड (Eppeltone Engineers Limited) या कंपनीचा आयपीओ (IPO) बाजारात दाखल होत आहे. हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी एनएसई एसएमई (NSE SME) या प्रवर्गात येणार आहे. १७ ते १९ जून कालावधीत हा आयपीओ बाजारात दाखल होईल. २४ जूनला कंपनी बाजारात सूचीबद्ध (Listed) होणार आहे. कंपनीने १२५ ते ११८ रूपये प्रति समभाग (Share) Price Band निश्चित केला आहे.
किरकोळ गुंतवणूकदारांना या आयपीओत कमीतकमी १२५००० रूपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. कमीत कमी १००० गठ्ठे (Lot) घ्यावे लागतील. एक्सपर्ट ग्लोबल कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड (Expert Global Consultants Pri vate Limited) ही कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर (Book Leading Manager) म्हणून काम पाहणार आहे. तर स्कायलाईन फायनांशियल सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड (Skyline Financial Services Private Limited) कं पनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे. मार्केट मेकर (Market Maker) म्हणून प्रभात फायनांशियल सर्विसेस लिमिटेड (Prabhat Financial Services Limited) काम पाहतील.
मार्केट मेकर म्हणून १७२००० शेअर्स प्रभात फायनांशियल सर्विसेसकडे असतील. एकूण आयपीओतील पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ५०% वाटा गुंतवणूकीसाठी आरक्षित असणार आहे तर ३५% वाटा किरकोळ गुंतवणूकदार (Retail Investors) यांच्यासाठी तर विना संस्थात्मक गुंतवणूकदार (Non Institutional Investors NII) यांच्यासाठी १५% वाटा आरक्षित असणार आहे.
Eppeltone Engineers Limited कंपनी १९७७ साली स्थापन झाली होती. कंपनी मुख्यतः इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर, युपीएस सिस्टिम, एव्हीआर, एमसीबी या तत्सम इलेक्ट्रॉनिक उत्पादनात कार्यरत आहे. कंपनी बी टू बी (B2B) क्षेत्रात अधिक कार्यरत असून सरकार, खाजगी, विना सरकारी आस्थापनांना आपली सेवा व उत्पादने पुरवते.
आर्थिक वर्ष मार्च २०२४- मार्च २५ यामधील एक वर्षाच्या कालावधीत कंपनीच्या महसूलात (Revenue) मध्ये ५७% वाढ झाली आहे. तर आर्थिक वर्षातील करोत्तर नफा (Profit After Tax PAT) मध्ये ३८% वाढ झाली आहे. कंपनीचे सध्याला बाजार भांडवल (Market Capitalisation) एकूण १६५.८८ कोटी आहे.
कंपनीचे प्रवर्तक (Promoter) रोहित चौधरी, देवेन चौधरी, रेशू चौधरी आहेत. ही कंपनी हरिशचंदर चौधरी यांनी स्थापन केली होती. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतून मिळणाऱ्या निधीचा वापर खेळत्या भांडवल (Working Capital) गरजेसाठी, भांडवली खर्चासाठी, दैनंदिन कामकाजासाठी, व इतर काही खर्चासाठी करण्यात येणार आहे.