
साप्ताहिक राशिभविष्य, १५ जून ते २१ जून २०२५
![]() | जोडीदाराच्या मतास प्राधान्य द्यामेष : आपणास काही निर्णय घ्यायचे असल्यास जोडीदाराचे मत आजमावून पाहा. व्यापार-व्यवसायातील काम पूर्ण होण्यासाठी नोकरदारांची आपणास साथ मिळणार आहे. घरातील बारीक सारीक वादांकडे आपणास स्वतःला लक्ष द्यावे लागणार आहे. स्थावर मालमत्तेची कामे करताना आपणास पूर्ण दक्ष राहावे लागणार आहे. कागदपत्रे नीट आहेत की नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रगती होणार आहे. आपल्याला मनासारखा प्रोजेक्ट मिळू शकतो. |
![]() | नवीन संधी मिळतीलवृषभ : ज्या व्यक्ती नोकरी करतात त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये चांगले बदल होतील. आपल्याला चांगल्या कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळू शकते. आपण सावध राहणे बरे. नोकरीमध्ये बढतीचे योग आहेत. वरिष्ठ आपल्या कामावर खूश असणार आहेत. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आप्तेष्ट, नातेवाईक मंडळींशी नातेसंबंध मधुर ठेवण्याचा प्रयत्न करा. आर्थिक गुंतवणूक करताना दक्ष राहणे आवश्यक आहे. नियम व अटींचे पालन करा. कोर्ट कामांना गती मिळण्याची शक्यता. लाभ होईल. |
![]() | प्रवास होतीलमिथुन : प्रवासामध्ये आपणास लाभ होणार आहेत. सामाजिक दृष्टिकोनातून यश, मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढवणारा आहे. उच्चस्तरीय लोकांच्या संपर्कात येणार आहात. अविवाहित व्यक्ती विवाहाच्या बंधनात अडकणार आहेत. आपल्या पारंपरिक स्थावर मालमत्तेविषयी काही वादविवाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या मध्यावधीमध्ये अचानक बदल लाभाची शक्यता आहे. त्यामुळे आपण प्रफुल्लित राहाल. कर्माबरोबर आपल्या भाग्याची साथ लाभणार आहे. धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होईल. |
![]() | वाद-विवाद टाळाकर्क : ज्या व्यक्ती स्थावर मालमत्तेविषयी काम करतात, त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये अचानक नवीन नवीन अडचणी येऊ शकतात. काही व्यक्तींचे व्यवहार रद्द होऊ शकतात. या कालावधीमध्ये वाद-विवादापासून लांब राहणे चांगले आहे. काही चुकीच्या कामामुळे कोर्टकचेरी होऊ शकते. पोलीस दल किंवा सैन्यामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना जास्त कामाचा ताण वाढणार आहे. अचानक शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामांमध्ये नवीन व सकारात्मक दिशा मिळणार आहे. सरकारी नोकरी करणाऱ्यांना बढती मिळेल. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. आर्थिक व्यवहार चांगले होऊन, पैशाची आवक चांगली होणार आहे. |
![]() | व्यवसाय वाढीसाठी प्रयत्नशील राहालसिंह : या सप्ताहामध्ये व्यापार व्यवसायाची सुरुवात मध्यम गतीने होणार आहे. जसा जसा कालावधी पुढे जाईल तशी व्यापार-व्यवसायात प्रगती होणार आहे. आपण व्यवसाय वाढीसाठी प्रयत्नशील राहाल. नवीन प्रोजेक्टवर काम सुरू होण्याची शक्यता आहे. ज्यांचा व्यवसाय पारंपरिक आहे त्यांना चांगले परिणाम दिसायला लागतील. नोकरी करणाऱ्यांना पण हा कालावधी चांगला असणार आहे. वरिष्ठांची मर्जी असणार आहे. नोकरी-व्यवसायातील टारगेट पूर्ण करण्यासाठी आपण सक्षम आहात. कर्मचारी वर्गाची आपले चांगले संबंध असणार आहेत. आर्थिकदृष्ट्या आपली परिस्थिती चांगली असणार आहे. कल्पनाशक्तीला वाव मिळणार आहे. |
![]() | महत्त्वाची कामे करून घ्याकन्या : वाद-विवाद वाढवू नका. इतके की घरातील एखादे मंगल कार्य पुढे टाकावे लागेल. आपण कोणाकडून कर्ज घेतले असेल, तर ते फेडण्यासाठी परत परत मागणी होईल. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये महत्त्वाची कामे करून घ्या. यामध्ये आपल्याला स्त्री वर्गाचे सहकार्य मिळणार आहे. आर्थिक लाभाचे प्रमाणही वाढणार आहे. वरिष्ठ जर स्त्री वर्ग असेल तर दुधात साखरच पडणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात कोणतेही काम विचारपूर्वकच करणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. शेअर बाजार, तेजी मंदी, सोने-चांदी या व्यवसायामध्ये लाभकारी व्यवहार होऊ शकतात. |
![]() | आनंदाची झलक निर्माण होईलतूळ :सप्ताहाची सुरुवात सुखद क्षणांनी होणार आहे. आपल्या चेहऱ्यावर आनंदाची झलक निर्माण होणार आहे. आपल्यासाठी आपला जोडीदार व मुले आपली प्रत्येक मागणी पूर्ण करणार आहेत. आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. चुकीच्या संगतीमध्ये राहत नाहीत ना, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. जोडीदारामधील सकारात्मक बदल आपणास जाणवणार आहे. घरातील चहाच्या पेल्यातील वादळे समाप्त होणार आहेत. सप्ताहाच्या मध्यावधीमध्ये व्यापार व्यवसाय उत्तम चालणार आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन नोकरीच्या संधी येऊ शकतात. कामांमध्ये प्रगती होणार आहे. आपल्या प्रयत्नांना चांगले यश मिळणार आहे. |
![]() | प्रकृतीची काळजी घेणे आवश्यकवृश्चिक : ऑफिसमध्ये आपणास स्टाफ वाढवण्याची गरज भासणार आहे. महिलांसाठी हे दिवस थोडे कडू-गोड असण्याची शक्यता आहे. ज्या महिला बाहेर नोकरी-व्यवसाय करतात त्यांना दोन्हीकडे कामाचा ताण असणार आहे. घरीपण पाहुण्यांची ये-जा असेल आणि आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा काम जास्त करावे लागेल. यासाठी आपण योग्य ती स्वतःची प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. ज्या व्यक्ती कलाक्षेत्रात खेळामध्ये आहे, तसेच स्पर्धांमध्ये यश येणार आहे. या कार्यक्षेत्रातील लोकांना चांगल्या प्रकारे सफलता मिळणार आहे. गुढ अभ्यास तसेच अध्यात्मामध्ये आवड निर्माण होणार आहे. |
![]() | परिश्रमाला पर्याय नाहीधनु : वैवाहिक जीवनात थोडी वादावादी, कलह होण्याची शक्यता निर्माण होणार आहे. तसेच आपल्या जोडीदाराची तब्येत कमजोर असू शकते. तसेच आपल्या स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. काही कालावधीत आपण भावुक होणार आहात, तर त्यावेळी दोघेही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहात. यावेळेस एकमेकांबद्दल विचार करून आनंदी जीवन जगाल. प्रेमिकांनी एकमेकांना मजेमध्ये सुद्धा दुखावू नका. अत्यंत परिश्रमानंतर आपणास यश मिळणार आहे. त्यामुळे परिश्रमाला पर्याय नाही, प्रयत्नांती परमेश्वर याचा अनुभव घ्याल. |
![]() | आत्मविश्वासामध्ये वाढ होईलमकर : ज्या व्यक्ती नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे. आपणास बदली हवी असल्यास बदली होऊ शकते, तसेच पगारवाढ किंवा प्रमोशनचे योग आहेत. या कालावधीत आपणास अधिकार योग आहे. आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे. त्याचप्रमाणे आपली प्रगती निश्चित आहे. त्याचप्रमाणे अधिक कामाने प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे किंवा जुने आजार वर तोंड काढण्याची शक्यता आहे. डायबेटिस, हृदयविकार असेल त्यांनी आपल्या प्रकृतीकडे नीट लक्ष द्यावे. आपल्या भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होणार आहे. राहणीमान आपले उंचावणार आहे. |
![]() | प्रगती होईलकुंभ : आपल्या कार्यक्षेत्रात स्वतःच्या गुणाने, कार्यकौशल्याने प्रगती समोर दिसून येत आहे. आपल्या जबाबदाऱ्या तुम्ही चांगल्या तऱ्हेने पार पाडत आहात. पण याच कारणाने शत्रू तोंड वर काढणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात आजूबाजूचे लोक यांच्याशी आपण गोडीगुलाबीने राहावे. आपल्या भावनांवर आवर घालणे आवश्यक आहे. तसेच अधिकारी व्यक्तींशी चांगले संबंध ठेवणे आवश्यक आहे. आपले आत्मनिरीक्षण करणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. आपल्यामध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. |
![]() | उल्लेखनीय यशमीन :आपणास चांगले यश मिळणार आहे. आपल्याला भाग्याची साथ असणार आहे. या कालावधीमध्ये आपणास उल्लेखनीय यश मिळणार आहे. जर आपण सरकारी कामात असाल तर लोकांचा विश्वास तसेच यश, आपली स्वतःची नवीन ओळख निर्माण करणारा हा कालावधी आहे. आपल्याला प्रसिद्धी मिळणार आहे. मान- सन्मानामध्ये वृद्धी होणार आहे. आपण आपल्या विरोधी पक्षांना मात देणार आहात. धनलाभाचे चांगल्या प्रकारे योग आहेत. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रत्यक्षात विचारविनिमय आणि सामंजस्याने प्रश्न सोडवलेले चांगले. |