Saturday, October 25, 2025
Happy Diwali

Uttarakhand: केदारनाथजवळ गौरीकुंडच्या जंगलात हेलिकॉप्टर क्रॅश, पायलटसह ७ जणांचा मृत्यू

Uttarakhand: केदारनाथजवळ गौरीकुंडच्या जंगलात हेलिकॉप्टर क्रॅश, पायलटसह ७ जणांचा मृत्यू

उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये केदारनाथ धामजवळ गुप्तकाशीसाठी उड्डाण केलेले आर्यन एव्हिएशनचे एक हेलिकॉप्टर गौरीकुंडच्या जंगलात क्रॅश झाले आहे. या दुर्घटनेत पायलटसह ७ प्रवासी होते. यात एका मुलीचाही समावेश होता. मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत साऱ्यांचाच मृत्यू झाला आहे. हे हेलिकॉप्टर केदारनाथ धाम येथून प्रवाशांना घेऊन गुप्तकाशीला परतत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ५.१७ मिनिटांच्या सुमारास आर्यन कंपनीच्या हेलिकॉप्टरने ६ भाविक आणि पायलटसह केदारनाथ हेलिपॅड येथून गुप्तकाशीसाठी टेकऑफ केले होते. रस्त्यात हवामान खराब असल्याने हेलिकॉप्टर क्रॅश झाले. या दुर्घटनेत पायलटसह ७ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. राजवीर असं या पायलटचं नाव आहे. विक्रम रावत, विनोद, तृष्टी सिंह, राजकुमार, श्रद्धा आणि राशी(वय वर्षे १०) अशी मृत पावलेल्यांची नावे आहेत.

 

या अपघातामागे खराब हवामान हे कारण सांगितले जात आहे. केदारघाटीमध्ये प्रचंड धुके आणि वेगवान हवेमुळे हेलिकॉप्टर रस्ता हरवले होते. यानंतर हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला आणि गौरीकुंडच्या जंगलात ते क्रॅश झाल्याची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीम घटनास्थळी रवाना झाली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >