Trump on Israel Iran conflict: 'जसा मी भारत-पाकिस्तान संघर्ष सोडवला, तसाच...' डोनाल्ड ट्रम्पचा दावा

इस्रायल-इराणमध्ये शांतता घडवून आणण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वर्क मोडवर


वॉशिंग्टन: ऑपरेशन सिंदूरनंतर वाढलेल्या भारत आणि पाक संघर्षामध्ये मध्यस्थी करत, दोघांमध्ये शस्त्रसंधी घडवून आणल्याबद्दल, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा स्वतःची पाठ थोपटत, मी इस्रायल आणि इराणमध्येही शांतता प्रस्थापित करू शकतो असा दावा केला आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटद्वारे त्यांनी हा दावा केला आहे. (Trump said on Israel Iran conflict)


अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केला आहे की, त्यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये ज्याप्रमाणे शस्त्रसंधी घडवून आली, अगदी त्याचप्रमाणे ते इस्रायल आणि इराणमध्येही शांतता आणू शकतात. ते पुढे असे म्हणतात की, यासाठी ते बैठका घेत आहेत आणि लवकरच पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होईल.  



इस्रायल आणि इराणमध्येही शांतता आणण्याचा प्रयत्न


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी दावा केला की ते भारत आणि पाकिस्तानप्रमाणेच इस्रायल आणि इराणमध्येही शांतता आणू शकतात. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर लिहिले की, जसा मी भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष सोडवला, तसे इराण आणि इस्रायलने देखील आता संघर्ष थांबवायला हवा, आणि ते तसे लवकर करतीलही.   मी भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा वाद सोडवण्यासाठी अमेरिकेच्या व्यापारविषयक मुद्यांचा वापर करून चर्चेत समजूतदारपणा, एकता आणि संतुलन आणले. दोन्ही देशांच्या नेत्यांनी त्यावर जलद निर्णय घेऊन, एकमेकांमधील संघर्ष थांबवला." पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षादरम्यान, ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, यासंबंधित चर्चेत ते व्यस्त आहेत आणि मागच्या दाराने फोनवर बोलत आणि भेटत आहेत.



'माझ्या हस्तक्षेपामुळे आतापर्यंत शांतता कायम आहे आणि तशीच राहील!'- ट्रम्प


ते पुढे म्हणाले की, लवकरच इस्रायल आणि इराणमध्ये शांतता निर्माण होईल! सध्या अनेक फोन संभाषणे आणि बैठका सुरू आहेत. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इतर आंतरराष्ट्रीय संघर्षांचाही उल्लेख केला आणि दावा केला की त्यांनी त्यात हस्तक्षेप केला होता. ते म्हणाले, माझ्या पहिल्या कार्यकाळात, सर्बिया आणि कोसोवामधील दशकांपासून चाललेला संघर्ष शिगेला पोहोचला होता आणि हा दीर्घकाळ चालणारा संघर्ष युद्धात रूपांतरित होण्याच्या तयारीत होता. मी ते थांबवले. त्यांनी पुढे असे देखील म्हंटले की, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी काही अतिशय मूर्ख निर्णय घेतले, ज्यामुळे दीर्घकालीन शक्यतांना हानी पोहोचली. त्यांनी नाईल नदीच्या धरणावरून इजिप्त आणि इथिओपियामधील तणावाचे उदाहरण देखील यावेळी दिले. ते म्हणाले, 'माझ्या हस्तक्षेपामुळे आतापर्यंत शांतता कायम आहे आणि तशीच राहील!'



इस्रायलचे हवाई हल्ले वाढले आहेत आणि इराण आणि इस्रायलमध्ये मृतांची संख्या वाढत आहे. हे दोन्ही देश एकमेकांच्या जिवावर उठले असल्यासारखे एकमेकांवर हल्ले चढवत असताना, ट्रम्प यांनी या दोघांमध्ये शांतता शक्य असल्याचे म्हंटले आहे. आपली पाठ थोपटताना ते म्हणतात, 'मी सर्वांसाठी खूप काही करतो, पण माझे कधीही कौतुक होत नाही, तरीही ते ठीक आहे, लोक समजून घेतात. मध्य पूर्व (पश्चिम आशिया) पुन्हा महान बनवा!'

Comments
Add Comment

भारताने मुरीदकेत हल्ला केला तर चूक काय? पाकिस्तानी मौलानांचा आर्मी चीफ मुनीरांना थेट सवाल

कराची : कराचीतील ल्यारी भागात बसून पाकिस्तानचे ज्येष्ठ धर्मगुरू आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम (फजल)चे अध्यक्ष मौलाना

अमेरिकेतील नोकऱ्यांवर टांगती तलवार

एच१बी व्हिसाच्या नव्या नियमांमुळे शेकडो नागरिक अडकले भारतातच वॉशिग्टन : अमेरिकेत नोकरी करणारे शेकडो भारतीय एच१

बांगलादेशात रक्तरंजित राजकीय संघर्ष

आणखी एका हसीनाविरोधी नेत्याला घरात घुसून घातल्या गोळ्या बांग्लादेश : बांगलादेशमध्ये शेख हसीना विरोधी आणखी एका

बांगलादेशमध्ये उस्मान हादी पाठोपाठ मोहम्मद मोतालेब शिकदारची हत्या

ढाका : बांगलादेशमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील हंगामी

दक्षिण आफ्रिकेत गोळीबारात १० जण ठार

जोहान्सबर्ग : ऑस्ट्रेलियामध्ये बाँडी बीचवर बेछूट गोळीबार करण्याची घटना ताजी असतानाच आता दक्षिण आफ्रिकेतील

बांगलादेशातील चितगावमधील भारतीय व्हिसा सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली (प्रतिनिधी): बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय व्हिसा अर्ज केंद्राने