Saturday, October 25, 2025
Happy Diwali

महापालिका शाळेत आता गुरुवार गणिताचा

महापालिका शाळेत आता गुरुवार गणिताचा

मुंबई : ’मिशन मेरिट’ उपक्रम अंतर्गत मुंबई महानगरपालिका व खान अकॅडमी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी “गणित गुरुवार” हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून महानगरपालिकेच्या सर्व शाळांतील इयत्ता ६ वी ते १० वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी प्रत्येक गुरुवारी रात्री ८ ते १० वाजेदरम्यान किमान ३० मिनिटे खान अकॅडमी या डिजिटल प्लॅटफॉर्मवर गणिताचा सराव करतील.

विद्यार्थ्यांनी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून "गणित गुरुवार" हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

Comments
Add Comment