कधी न कळलेला ‘बाबा’

  134

आयुष्यातल्या छोट्या-मोठ्या क्षणांचा आनंद साजरा करण्यासाठी आपण अनेक नवनवीन डेज साजरे करतो, मग तो मर्दस डे असो. वा फार्दस डे असो. आनंद साजरा करायला फक्त काही निमित्त असणे गरजेचे असते.
आता नुकताच होऊन गेलेला मर्दस डे आपल्या सर्वांच्या आईच्या चेहऱ्यावर काही सुखद अनुभवाचे क्षण नक्की देऊन गेला असेल. कारण आई आणि तिच्या मुलाचं नातं हे अतिशय गोड असतं. आई खूप हळवी‌,‌ मायाळू असते. तिच्याशी असलेली लाघवी एका सुंदर नात्याचे दर्शन घडविते. पण बाबा..., बाबा म्हटलं की डोक्यावर आठ्या, मनात थोडीशी भीती, आपण चुकलो तर ओरडा हा नक्कीच मिळेल अशी असलेली धाकधूक एका सोज्वळ माणसाच्या निर्मळ स्वभावावर जणू पर्दा टाकते आणि बाबांचं प्रेम हे कायमच अनुत्तरित राहते. पण खरंच वडील हे असेच असतात का? हा प्रश्न कायमच मनाला भेडसावतो. पण म्हणतात ना काही कोडी जितकी अवघड दिसतात तेवढी ती नसतात. मात्र सभोवताली असलेली परिस्थिती तसे चित्र उभे करते.


कधी कधी आजारावर मात करण्यासाठी कडू औषधाशिवाय पर्याय नसतो. कारण औषध जितके कडू तितकंच ते एखादा आजार सहज बरा करण्यासाठी उपयुक्त ठरते. तसेच काहीसे आपले वडील. जे कायमच शिस्त, अनुशासन, चांगल्या विचारांचे, वागणुकीचे पाढे लहानपणापासून गिरवायला शिकवतात. त्यांच्या या सक्त स्वभावामुळे व कटू बोलण्यामुळे हे सगळं करण्यामागचा नि:स्वार्थ हेतू मात्र दिसेनासा होतो. अनेकदा आपल्या तोंडून लहान-मोठ्या जखमा किंवा वेदनांवेळी आई, आई गं... असे सहज निघून जाते, मात्र डोळ्यांसमोर एखादं मोठं संकट उभं राहतं तेव्हा बाप रे... ही हाक अंतर्मनातून कळवळून येते कारण त्या मनालाही खात्री असते माझा बाप मला या संकटातून नक्कीच मुक्त करेल. असं म्हणतात, आपल्या वडिलांची चप्पल जेव्हा त्यांच्या मुलाला अगदी व्यवस्थित बसते तेव्हा मुलगा जबाबदारीने वागण्यासाठी परिपूर्ण होतो. मात्र त्या चप्पलांमध्ये बसणारे हे पाय कधी कुठे धडपडू नयेत, कोणती वाईट वाट धरू नये यासाठी अफाट कष्ट करणारा बाबा आपल्या मुलांसाठी सदैव तत्पर असतो. इतक्यावरच नाही हा संपत त्यांचं प्रेम. आपल्या गरजा, स्वप्न, इच्छा सगळं काही विसरून माझी पाखरं उंच भरारी घ्यावीत यासाठी कायम तो तडजोड करतो. बाबा मला आज हे हवं म्हटल्याचं क्षणी ते कसे देता येईल म्हणून स्वतःसाठी कधी बाजूला काढून ठेवलेले पैसेही तो त्याच्या लेकरांसाठी वापरतो. लहानपणी चालणं जरी आईने शिकवले असले तरी त्या वाटेवर चालताना येणारे अडथळे बाबाच दूर करतो. तो कधीच आपल्या मुलांचे तोंडभरून कौतुक करणार नाही. पण आपली लेकरं हळूहळू यशाची वाटचाल करतायेत हे समजल्यावर देवासमोर उभा राहून हात मात्र जोडतो. तसेच जबाबदारीचे ओझे खांद्यावर कितीही असले तरी त्याच खांद्यावर बसून फिरवताना हे जग सुंदर आहे मात्र दिसतं तेवढं सामान्य नाही म्हणून दुनियादारीचे धडे शिकवतो. बाप हे आयुष्याच्या चित्रपटातलं एक असं पात्र आहे जो संपूर्ण आयुष्याचा चित्रपट घडवतो. पण प्रेक्षकांच्या भूमिकेत राहून माझा काहीच रोल नाही असं म्हणत फक्त आपल्या मुलांचा चित्रपट हिट झाल्यावर येणारे आनंद अश्रू लपवतो. खरंच वडील ही एक अशी व्यक्ती आहे जी सहजासहजी समजणं कठीण आहे. पण त्या व्यक्तीमुळे येणारा प्रत्येक दिवस हा आनंदी आहे. तसेच अगदी मनापासून बोलावेसे वाटते, भय नाही या मनास‌, कारण माझ्यामागे माझा खंबीर ‘बाबा’ उभा आहे.

Comments
Add Comment

शहाणपण

जीवनगंध : पूनम राणे दिनेश शाळेतून घरी आल्यापासूनच खूपच नाराज दिसत होता. आई त्याला खोदून खोदून विचारण्याचा

पसायदान

काळोखाच्या गावी, प्रकाशाच्या वाटा : श्रद्धा बेलसरे खारकर आळंदीच्या ‘पसायदान गुरुकुला’तून बाहेर पडताना खूप

सृष्टीची निर्मिती

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे ह्मदेवाने आपल्या विविध अंगापासून ऋषींची (मानसपुत्रांची) उत्पत्ती केली.

प्रथा...

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर लंडनमध्ये घडलेली एक घटना... मार्गारेट थेंचरबाई पंतप्रधान असताना त्यांनी देशाच्या

‘वो भारत देश है मेरा...’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे ए न. सी. फिल्म्सचा केदार कपूर दिग्दर्शित ‘सिकंदर-ए-आझम’ हा सिनेमा १९६५ साली आला.

पालकत्व आणि वैवाहिक आयुष्यातील समतोल

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू नवीन पालक होणे हा आनंद, प्रेम आणि नवीन अनुभवांनी भरलेला एक रोमांचक प्रवास असतो. हा