विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत मिळणार - प्रताप सरनाईक

मुंबई : शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना आता एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत. तशा सूचना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत.


मंत्री सरनाईक म्हणाले की, नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा १६ जून पासून सुरू होत आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून ६६.६६% इतकी सवलत दिली आहे, म्हणजे केवळ ३३.३३% रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे शासनाच्या " पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर " योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून पास घ्यावे लागत होते. किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापन कडून पास घेतले जात असत.


आता विद्यार्थ्यांना पास साठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा -महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्या कडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत. जेणेकरून त्यांचा शैक्षणिक वेळ वाया जाणार नाही.


या संदर्भात १६ जून पासुन एसटी प्रशासनातर्फे "एसटी पास थेट तुमच्या शाळेत" ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे.


या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होणार आहे.असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.

Comments
Add Comment

Ladki Bahin Yojana : 'हा' तर लाडका निघाला ! अहिल्यानगरात ५२३ पुरुषांनी लाटले ७४.७५ लाख

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने राज्यातील गरजू महिलांसाठी सुरु केलेली लाडकी बहीण योजना अनेक महिलांसाठी मोठा आधार देणारी

Minister Nitin Gadkari : जळगाव बायपास प्रकरणी मोठी कारवाई ! नितीन गडकरींचे चौकशीचे आदेश, दोषी ठेकेदार होणार ब्लॅकलिस्ट

Minister Nitin Gadkari : सुरत–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील (Surat–Nagpur National Highway) पाळधी ते तरसोद बायपासच्या रेल्वे उड्डाणपूलाच्या

Radhakrishna Vikhe-Patil : मराठा जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणावर सरकार अलर्ट! ‘जाणीवपूर्वक गैरप्रकार आढळल्यास कारवाई करू’ : राधाकृष्ण विखे-पाटील

संगमनेर : मराठा जात प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या काही घटनांवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा

State Government : राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना १० लाखांचे विमा संरक्षण

अपघाती मृत्यू व अपंगत्वासाठी आर्थिक मदत; वैद्यकीय उपचारासाठी १ लाखांपर्यंतचे कवच मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या

Jalgaon : दोघांचा अपघातात तर एकाचा तलावात बुडाल्याने मृत्यू , एकाच दिवशी तीन दुर्दैवी घटना घडल्याने जळगाव जिल्हा हळहळला

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात बुधवारी घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांनी जिल्हा हळहळला आहे. घडलेल्या दुर्घटनांमध्ये

Pratap Sarnaik : १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले मराठीचे धडे

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल मुंबई : "