इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची इराणला साथ

इस्लामाबाद : इस्त्रायल विरोधात सैन्य संघर्षात इराणला चीन, रशियानंतर आता पाकिस्तानची साथ मिळाली आहे. पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी इराणचे राष्ट्रपती मसूज पेजेक्शियन यांच्याशी संवाद साधला.इस्त्रायलकडून होणारे हल्ले उकसवण्याचा प्रकार असल्याचे पाकिस्तानने म्हटले. त्यासोबतच इस्त्रायल विरोधात मुस्लीम राष्ट्रांना एकजूट होण्याचं आवाहन पाकिस्तानने केले आहे.


शहबाज शरीफ यांनी शनिवारी(दि.१५) इराणी राष्ट्रपतींशी फोनवरून चर्चा केली. त्यात इस्त्रायलकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला. हा हल्ला इराणच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला आव्हान देणारा असून आंतरराष्ट्रीय कायद्याचेही उल्लंघन केले आहे. इस्त्रायलने विनाकारण केलेल्या हल्ल्याविरोधात पाकिस्तान इराणसोबत एकजुटीने उभा आहे. इराणला आत्मरक्षणाचा अधिकार आहे. इस्त्रायल प्रादेशिक, जागतिक शांतता आणि स्थिरतेसाठी गंभीर धोका निर्माण करत आहे असा आरोपही शहबाज शरीफ यांनी केला.


तसेच शहबाज यांनी जागतिक समुदायाकडे, संयुक्त राष्ट्र आणि मुस्लिम देशांना इस्त्रायलविरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांच्या अवैध कृत्यांना आळा घालण्यासाठी तात्काळ पाऊले उचलण्याची मागणी केली आहे. पाकिस्तान शांतता राखण्यासाठी कटिबद्ध आहे आणि त्याबाबत भूमिका निभावण्याची तयारी असल्याचे शरीफ यांनी म्हटलं. तर इराणचे राष्ट्रपती यांनीही कठीण काळात आणि संयुक्त राष्ट्र परिषदेत इराणची साथ दिल्याबद्दल पाकिस्तानचे आभार मानले आहेत. शरीफ यांच्या भूमिकेने दोन्ही देशातील संबंध आणखी घनिष्ठ झाल्याचे हे दिसून येते असंही त्यांनी म्हटलं.


इस्त्रायलने शुक्रवारी(दि.१५) इराणच्या अण्वस्त्र सेंटर आणि सैन्य तळांवर हल्ले केले. त्यात इराणचे अनेक वरिष्ठ सैन्य प्रमुख आणि अण्वस्त्र वैज्ञानिक मारले गेले. इराणनेही या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्त्रायलच्या तेल अवीव या प्रमुख शहरांवर मिसाईल हल्ले केले.


दरम्यान, या तणावाच्या परिस्थितीत इराणने पाश्चात्य देशांना मोठा इशारा दिला आहे. पाश्चात्य देशांनी जर इस्त्रायलला मदत केली तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. जर पाश्चात्य देशांनी इस्त्रायलवर होणारे इराणी हल्ले रोखण्यास मदत केली तर अमेरिका, ब्रिटन, फ्रान्सच्या सैन्य ठिकाणांवर आणि त्यांच्या युद्धनौकांवर टार्गेट हल्ला करण्यात येईल असं इराणने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

Comments
Add Comment

कॅनडात १४० कोटींच्या सोन्याची चोरी

मास्टरमाईंड भारतात लपल्याचा दावा टोरंटो : टोरंटो पिअरसन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या २ कोटी कॅनेडियन

इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर अमेरिकेचा २५ टक्के आयातकर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाचे स्वयंघोषित कार्यकारी अध्यक्ष

वॉशिंग्टन  : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ

इराणमध्ये अस्थिरता कायम; आंदोलनातील मृतांचा आकडा पाचशे पार..

तेहरान : इराणमध्ये सुरू असलेली सरकारविरोधी आंदोलनं अद्यापही थांबलेली नसून, देशातील अनेक भागांमध्ये परिस्थिती

इराणच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यास अमेरिका तयार : ट्रम्प

वॉशिंग्टन : इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक

संयुक्त राष्ट्रे : रशियाने यूक्रेनवर केलेल्या नव्या हल्ल्यांनंतर दोन्ही देशांमधील संघर्षाबाबत संयुक्त