मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट

मुंबई (प्रतिनिधी) : यंदा मान्सून आधीच दाखल झाल्याने पाणीकपात नाही, म्हणून मुंबईकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता, मात्र तलाव क्षेत्रात पावसाने पाठ फिरवल्याने मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत ९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.


पाऊस अजून लांबल्यास मुंबईकरांना १० ते १५ टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. शिल्लक साठा व पावसाचा अंदाज घेत यावर्षी मुंबई महापालिकेने पाणीकपात न करण्याचा निर्णय घेतला आहे. तलावातील पाणीपातळी घटल्यामुळे राखीव पाणी साठ्यातून मुंबईत पाणी आणण्यात येणार आहे.


यातून मुंबईकरांची तहान भागणार असली तरी फार काळ राखीव कोट्यातील पाणीसाठा वापरणे शक्य नाही. येणाऱ्या आठवडाभरात तलाव क्षेत्रात पाऊस दाखल झाला, तर ठीक अन्यथा सध्याचा पाणीसाठा मुंबईकरांना अजून महिनाभर पुरवण्यासाती मुंबई महापालिकेसमोर पाणीकपात करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.

Comments
Add Comment

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती