ज्ञान तेथे सन्मान

विद्याविभूषितांचे
गोडवे गातात सारे
त्यांच्याकडे ज्ञानाचे
असती खळाळते झरे
राजा असतो त्याच्या
राज्यात पूजनीय
विद्वान मात्र साऱ्या
विश्वात वंदनीय
विद्वानास ठाऊक
ज्ञान नाही वाया जात
ज्ञानासारखे पवित्र
नाही काही जगात
जे जे ठाऊक आपणास
ते ते वाटून द्यावे
ज्ञान दिल्याने वाढते
लक्षात पक्के ठेवावे
पैसाअडका धनदौलत
चोरीस जाऊ शकेल
ज्ञानाची चोरी सांगा
कशी कोण करेल?
ज्ञानाची अक्षरपाटी
ज्याची राहील कोरी
अज्ञानामुळे आयुष्य
दुःखाच्या जाई दारी
अज्ञानामुळेच पुढे
वाढत जाते अंधश्रद्धा
प्रगतीच्या मार्गात मग
येती अवघड बाधा
म्हणूनच ज्ञानाची गंगोत्री
आपण सारे होऊ
ज्ञानाचे दीप लावूनी
अज्ञानाला पळवून लावू
Comments
Add Comment

पितृसेवा

महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरे एकदा महर्षी व्यासांना त्यांच्या सर्व शिष्यांनी प्रश्न केला की हे भगवान, या

‘ये जंग क्यों है?’

नॉस्टॅल्जिया; श्रीनिवास बेलसरे ताजमहाल’(१९६३) ही तशी प्रेमकथा, पण साहिर लुधियानवी नावाच्या चिंतनशील कवीने १९६३

मायेचं चैत्रगौर

स्पंदन; अश्विनी शिंदे - भोईर भारतीय माणूस म्हणजे उत्सवप्रिय. सणांमध्ये...उत्सवांमध्ये रमणारा. आज आपल्या सणवार

मनभावन चैत्रगुढी

स्मृतीगंध; लता गुठे मुंबईसारख्या महानगरात सिमेंटच्या जंगलात राहताना कधी ऋतू बदलतो समजतही नाही; परंतु ग्रामीण

भारताची भविष्योन्मुख वाटचाल

विशेष; प्रा. सुखदेव बखळे गेल्या काही दशकांमध्ये देशातील वीजमागणी झपाट्याने वाढत आहे. पण जीवाश्म इंधनांवर

दीर्घकालीन युद्धाची सावली

विश्वभ्रमण; प्रा. जयसिंग यादव इराण-अमेरिकेतील संघर्ष केवळ शस्त्रांचा किंवा सामर्थ्याचा नाही, तर राजकारण,