Tuesday, July 8, 2025

उत्तराखंड : हेलिकॉप्टर अपघातात महाराष्ट्रातील तिघांचा मृत्यू

उत्तराखंड : हेलिकॉप्टर अपघातात महाराष्ट्रातील तिघांचा मृत्यू
रुद्रप्रयाग : उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंड येथे प्रतिकूल हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टर चालक आणि सहा प्रवासी अशा सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील वणीच्या जयस्वाल कुटुंबातल्या तीन जणांचा समावेश आहे. राजकुमार जयस्वाल (४२), श्रद्धा जयस्वाल (३४) आणि काशी जयस्वाल (२) यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. हे सर्व जण केदारनाथ येथे दर्शनासाठी जात होते.

जयस्वाल कुटुंबीय आणि गुजरात, उत्तरप्रदेशातील काही भक्त आर्यन एविएशनच्या हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करत होते. गौरीकुंड – सोनप्रयागच्या जंगलात प्रतिकूल हवामान आणि कमी दृश्यमानता यामुळे हेलिकॉप्टर भरकटले. थोड्या वेळाने हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या अपघातात कॅप्टन राजबीरसिंग चौहान आणि सहा प्रवासी अशा सात जणांचा मृत्यू झाला.

अपघातामध्ये राजकुमार जयस्वाल, त्यांची पत्नी श्रद्धा आणि मुलगी काशी यांचा मृत्यू झाला. जकुमार जयस्वाल हे वणीत राजा या नावाने ओळखले जात. वणीतील धार्मिक आणि सामाजिक कार्यात हे कुटुंब अग्रेसर होते. अलिकडेच त्यांनी वणी येथे पंडीत प्रदीप शर्मा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन केले होते. ते शिवभक्त होते. मुलीसोबत चारधाम यात्रा करण्याचा संकल्प केला होता म्हणून जयस्वाल दांपत्य काशीला घेऊन यात्रेसाठी निघाले होते. जयस्वाल दांपत्याचा मुलगा विवान हा पांढरकवडा येथे आजोबांकडे असल्याने या प्रवासात सोबत नव्हता.

पहाटे पाच वाजून १७ मिनिटांनी आर्यन कंपनीच्या हेलिकॉप्टरने सहा भाविक आणि हेलिकॉप्टर चालक असे सात जण केदारनाथ हेलिपॅड येथून गुप्तकाशीसाठी रवाना झाले. हेलिकॉप्टरने केदारनाथ हेलिपॅड येथून उड्डाण केले. पुढे मार्गात गौरीकुंड – सोनप्रयागच्या जंगलात प्रतिकूल हवामान आणि कमी दृश्यमानता यामुळे हेलिकॉप्टर भरकटले आणि कोसळले. राजवीर असे हेलिकॉप्टरच्या चालकाचे अर्थात पायलटचे नाव आहे. विक्रम रावत, विनोद, तृष्टी सिंह, राजकुमार, श्रद्धा आणि राशी अशी इतर मृतांची नावं आहेत. केदारघाटीमध्ये प्रचंड धुके आणि वेगाने वारा वाहत होता. या प्रतिकूल परिस्थितीत हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला आणि गौरीकुंडच्या जंगलात ते कोसळले.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा