Thursday, August 7, 2025

डीएनए चाचणीद्वारे शोधला माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींचा मृतदेह

डीएनए चाचणीद्वारे शोधला माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींचा मृतदेह
अहमदाबाद : एअर इंडियाच्या अहमदाबाद - लंडन मार्गावरील AI 171 विमानाला झालेल्या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मृत्यू झाला. विमानात असलेल्या २४२ जणांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. विमान ज्या ठिकाणी कोसळले तिथे असलेल्या ३३ नागरिकांचाही मृत्यू झाला. यामुळे विमान अपघातातील मृतांची एकूण संख्या २७४ झाली आहे. अनेक मृतदेह अपघातात अर्धवट जळून गेले आहेत. यामुळे मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी सुरू आहे. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम डीएनए चाचणीद्वारे पूर्ण करण्यात आले आहे. लवकरच विजय रुपाणींचा मृतदेह शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यासाठी नातलगांना सुपूर्द केला जाणार असल्याचे वृत्त आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ८६ पेक्षा जास्त मृतदेहांची ओळख डीएनए चाचण्यांद्वारे करण्यात आली आहे. याआधी गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम डीएनए चाचणीद्वारे पूर्ण केल्याचे जाहीर केले.



राजकोट येथे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याचे वृत्त आहे. पण या संदर्भातली सविस्तर माहिती अद्याप जाहीर झालेली नाही.

गुजरातमध्ये सोमवारी शोक

माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या निधनाचे वृत्त आले आहे. अपघातात अर्धवट जळालेल्या मृतदेहांमधून रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम डीएनए चाचणीद्वारे करण्यात आले आहे. गुजरात सरकारच्यावतीने संपूर्ण गुजरातमध्ये सोमवारी सरकारी शोक पाळला जाईल. राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणला जाईल. सोमवारी मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार नाही.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा