Wednesday, August 13, 2025

पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत

पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत
मुंबई : राज्यात विदर्भ वगळता इतर विभागांमध्ये सोमवार १६ जून, २०२५ रोजी शाळा सुरू होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दुर्वेस, तालुका, जिल्हा पालघर या शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.

तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनपा शाळा क्रमांक २३, किसन नगर, ठाणे तसेच शिवडी वडाळा इस्टेट मनपा शाळा, आंध्रा हायस्कूल जवळ, वडाळा या शाळेत उपस्थित राहतील तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटेवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जरेवाडी, तालुका पाटोदा, जिल्हा बीड येथे भेट देतील.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तुंगण दिगर तालुका बागलाण, जिल्हा नाशिक येथे विद्यार्थ्यांचे स्वागत करतील. शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर हे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा करंजी, ता. जि. वर्धा येथे भेट देऊन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करणार आहेत. यासोबतच राज्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >