मुंबई : मुंबईतील अमेरिकन महावाणिज्य दूतावास कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. ही माहिती मिळताच महावाणिज्य दूतावास कार्यालयाने पोलिसांना माहिती दिली. मुंबई पोलिसांनी यानंतर सखोल तपासणी केली. पण काहीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. अखेर मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात धमकी दिल्याचा गुन्हा नोंदवला आणि तपास सुरू केला आहे.
याआधी ३१ जून रोजी मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलला धमकीचा फोन आला होता. हॉटेल प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली होती. पोलिसांनी सखोल तपासणी केली पण कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. यानंतर मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात धमकी दिल्याचा गुन्हा नोंदवला आणि तपास सुरू केला.
मुंबईतील अमेरिकन महावाणिज्य दूतावास कार्यालय आणि ग्रँड हयात हॉटेल या दोन्ही प्रकरणांमध्ये धमकीचा फोन सर्वात आधी ज्या ठिकाणी आला त्या नंबरचे कॉल रेकॉर्ड तपासण्याचे काम सुरू असल्याचे समजते. या कॉल रेकॉर्डआधारे पोलीस तपास करत आहेत.