बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. स्वतः अजित पवार यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. त्यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी १३ जूनला चेअरमन अर्थात अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे जाहीर केले आहे.
एका जाहीर सभेत बोलताना अजित पवारांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवत असल्याचे जाहीर केले. जर अजित पवार माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अर्थात चेअरमन झाले तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक तसेच विविध संस्थांवर आणि संघटनावर अध्यक्ष पद भूषवलेली व्यक्ती पहिल्यांदाच माळेगाव सहकारी साखर कारखान्याची अध्यक्ष होणार आहे.