Manali zipline accident: नागपूरच्या १२ वर्षीय मुलीचा मनालीमध्ये अपघात, झिपलाइन दोर तुटल्याने दरीत कोसळली

  96

हार्नेसला जोडलेला झिपलाइन दोर तुटल्याने मुलगी खाली दगडांवर पडली.


कुटुंबासोबत मनालीमध्ये सुट्टीचा आनंद घेणाऱ्या त्रिशा बिजवेचा झिपलाइन राईड दरम्यान गंभीर अपघात झाला आहे. तिने घातलेल्या हार्नेसला जोडलेली दोरी अचानक तुटल्याने झिपलाइन चालवताना ती अचानक खोल दरीत पडली. ज्याचा व्हिडिओदेखील सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. जो पाहणाऱ्यांना हादरवून सोडत आहे.


महाराष्ट्रातील नागपूर येथील १२ वर्षीय मुलीला हिमाचल प्रदेशातील मनाली येथे झिपलाइन राईड दरम्यान पडून गंभीर दुखापत झाली असल्याचे वृत्त आले आहे. ही घटना गेल्या आठवड्यात जरी घडली असली तरी महाराष्ट्रासाठी धक्कादायकच म्हणावी लागेल. कारण ही मुलगी तिच्या कुटुंबासह मनाली येथे सुट्टी घालवण्यास गेली होती. या दरम्यान तेथील झिपलाइन राईडचा थरार अनुभवण्यासाठी गेली असता, तिने  घातलेल्या हार्नेसला जोडलेली दोरी अचानक तुटल्याने ती खोल दरीत कोसळली.


पर्यटन स्थळी साहसिक खेळांमध्ये पुरेशी सुरक्षा नसल्यास काय घडते हे नागपूरच्या या मुलीसोबत मनालीत घडले आहे. आता तिच्या कुटुंबाने व्हिडिओ शेअर केला आहे.



मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू


सुदैवाने मुलगी बचवली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात तिला अनेक फ्रॅक्चर झाले आणि काही दिवसांपूर्वी तिचे ऑपरेशन देखील झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्रिशाची प्रकृती स्थिर असल्याचे तिचे वडील प्रफुल बिजवे यांनी माहिती दिली.  ही घटना 8 जूनची असून, ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी तिथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती. कुटुंबाला तिथे कोणतीही मदत मिळाली नाही, असे त्रिशाच्या कुटुंबांचे म्हणणे आहे. सुरुवातीला मनाली, नंतर चंदीगडमध्ये तिच्यावर उपचार करण्यात आले. सध्या त्रिशावर नागपूरमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


या घटनेबद्दल बोलताना मनालीच्या डीएसपीने सांगितले की कुटुंब आणि झिपलाइन ऑपरेटर्समध्ये यांच्यामध्ये परस्पर समंजसपणा झाला आहे. पोलिस आणि पर्यटन अधिकाऱ्यांसह स्थानिक अधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परिसरातील साहसी राईड चालवणाऱ्या ऑपरेटर्सकडून सेफ्टी प्रोटोकॉल पाळले जात आहे की नाही? याचा आढावा घेत असल्याचे सांगितले.

Comments
Add Comment

Hingoli Train Fire : हिंगोली रेल्वे स्थानकावर उभ्या बोगीला भीषण आग; संपूर्ण बोगी जळून खाक

हिंगोली : हिंगोली शहरातील रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एका जुन्या बोगीला बुधवारी (६ ऑगस्ट) सकाळी सुमारे ८:३०

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश, कोकण रेल्वेच्या रो - रो कार सेवेला नांदगावात थांबा

कोकण रेल्वे प्रवासी संघ समन्वय संघर्ष समितीने देखील वेधले होते लक्ष मुंबईकर चाकरमान्यांसाठी दिलासादायक

Marathi Cinema Screen Issue: मराठी सिनेमाचे अतिरिक्त शोज मल्टीप्लेक्समध्ये लागणार! शासनाचा सर्वात मोठा निर्णय

मराठी सिनेमा जगविण्यासाठी आणि वाढवण्यासाठी राज्य सरकार सुचवणार उपाययोजना मुंबई: मराठी सिनेमांना

'यात्री ॲप'वर करा एसटीचे बुकींग!

मुंबई : चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप

माधुरीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार - मुख्यमंत्री मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि.

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक