Yellow Fertility & IVF Centre: यलो फर्टिलिटी अँड आयव्हीएफची विस्तार योजना

२०३० सालापर्यंत भारतातील मोठे आयव्हीएफ नेटवर्क बनण्‍याचा संकल्‍प

मुंबई: यलो फर्टिलिटी अँड आयव्हीएफ या भारतातील परवडण्याजोग्या आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या फर्टिलिटी केअर कंपनीने २०३० सालापर्यंत आपले फूटप्रिंट १०० केंद्रांपर्यंत नेण्याची महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. हा उपक्रम भारतातील एक मोठे व सर्वांत विश्वासार्ह आयव्हीएफ नेटवर्क होण्याच्या ब्रॅण्डच्या मिशनचा भाग आहे, तसेच भारतातील व जगभरातील अपत्यप्राप्तीची इच्छा असलेल्या व्यक्तींना उच्च दर्जाची व परवडण्याजोग्या दरांतील वंध्यत्व निवा रण सेवा उपलब्ध करून देत आहे. यलो फर्टिलिटीचे विस्तार धोरण बाजारपेठेच्या सखोल अभ्यासाच्या बळावर निश्चित करण्यात आले आहे. उच्चसंभाव्यता स्थळे निश्चित करून हे धोरण आखले गेले आहे. यांसाठी वंध्यत्व दर,सामाजिक घटक, प्रतिस्पर्धी ब्रॅण्डचे अस्तित्व, यशस्वी निष्पत्ती आणि प्रादेशिक दररचना यांसारख्या घटकांचा आधार घेण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे.

आघाडीच्या आयव्हीएफ तज्ज्ञांना आकर्षित करून घेणारे आणि त्याचबरोबर नवोन्मष्कारी, यशावर आधारित दररचनेचा लाभ घेऊन रुग्णांसाठी उपचार परवडण्याजोगे करणारे व्यापक व्यवसाय प्रारूप उभे करण्यावर यात भर दिला गेला आहे. आजवर दुर्लक्षित राहिलेल्या प्रदेशांना लक्ष्य करून, प्रथमच सेवा देणाऱ्या ब्रॅण्डला मिळणारा लाभ घेण्याचे व कार्यक्षेत्र विस्तारण्याचे लक्ष्य यलो फर्टिलिटीने ठेवले आहे. यलो फर्टिलिटी अँड आयव्हीएफच्या मुख्‍य कार्यकारी अधिकारी अंबिका भाईक म्हणाल्या, 'आम्ही केवळ आमच्या केंद्रांचा विस्तार करत नाही आहोत, तर वंध्यत्व निवारणाच्या उपचारांची उपलब्धता वाढवून कोट्यवधी जोडप्यांना आशेचा किरण दाखवत आहोत. अपत्यप्राप्तीसाठी दर्जेदार उपचार मिळणे हा विशेषाधिकार नव्हे, तर मुलभूत अधिकार आहे, या एकमेव विचारातून आमची विस्तार योजना उदयाला आली आहे.आमचा रुग्णकेंद्री दृष्टीकोन, परवडण्याजोग्या दरातील उपचार आणि किफायतशीरपणा हा आमच्या कामाचा गाभा आहे. या विस्तार योजनेच्या माध्यमातून आमचे हे काम आजवर दुर्लक्षित राहिलेल्या प्रदेशांमध्ये घेऊन जाण्याचा आमचा उद्देश आहे.'

डिसेंबर २०२३ मध्ये स्थापन झालेले यलो फर्टिलिटी सध्या अनेकविध केंद्रे चालवत आहे, त्यामध्ये गुरगाव-५७ व आता काश्‍मीरमधील त्यांचे फ्लॅगशिप एल२ केंद्र आणि गुरगाव-९० व दादरीमधील एल१ केंद्रांचा समावेश होतो. रुग्णकेंद्री धोरणा च्या आधारे उभारण्यात आलेला हा ब्रॅण्ड परवडण्याजोगे दर, पारदर्शकता व अत्याधुनिक वैद्यकीय कौशल्य यांचा मिलाप साधतो. आयव्हीएफच्या यशस्वीतेचा दर ८६ टक्के एवढा लक्षणीय आहे. सर्वांत छोटे सिंगल-सायकल आयव्हीफ पॅके ज १.४ लाख रुपयांत उपलब्ध आहे, यासाठी केल्या जाणाऱ्या ‘यलो काँट्रॅक्ट’ (Yellow Contract) या अनन्यसाधारण कराराद्वारे यलो फर्टिलिटी भारतातील वंध्यत्व निवारण उपचारांचे स्वरूप बदलत आहे. या करारात १०० टक्के यशाची ग्वाही दिली जाते.  दोन आयव्हीएफ चक्रांनंतरही गर्भधारणा झाली नाही, तर रुग्ण एका विशेष आश्वासन रकमेसह (Assurance Amount) उपचार पुढे चालू ठेवू शकतात, यात तिसऱ्या चक्रापासून पुढे केवळ उपभोग वस्तूंच्या खर्चाचा समा वेश केला जातो. यलो फर्टिलिटी अनेकविध प्रगत वंध्यत्व निवारण उपचार देऊ करते.  यांमध्ये सरोगसी, इन व्हायट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ IVF), इंट्रायुटेराइन इन्सेमिनेश (आययूआय IUI), एग अँड सिमन फ्रीझिंग, ओव्हरियन पीआरपी, जनुकीय चाचण्या आदींचा समावेश होतो. प्रत्येक उपचार पद्धती ही व्यक्तीच्या गरजा व खर्चाची तयारी यांनुसार निश्चित केली जाते असे कंपनीने म्हटले आहे.
Comments
Add Comment

Sikandar Shaikh car accident : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखच्या गाडीचा भीषण अपघात; थारचा चक्काचूर, पैलवान थोडक्यात बचावला

सोलापूर : सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर सांगोला-मिरज (Miraj) मार्गावर महाराष्ट्रातील नामांकित कुस्तीपटू

Jalgoan : जळगावात एफडीएची मोठी कारवाई ! २१ लाखांचा गुटखा जप्त

Jalgoan : जळगाव जिल्ह्यात अवैध गुटखा तस्करीविरोधात ( Illegal gutka smuggling) अन्न व औषध प्रशासनाने मोठी धाडसी कारवाई केले आहे. या

Pune Crime : पुण्यात गर्भलिंग निदान रॅकेटचा भंडाफोड; चिनी ॲपच्या माध्यमातून सुरू होता काळा धंदा

पुणे :  पुण्यात (Pune) उघडकीस आलेल्या बेकायदा गर्भलिंग निदान आणि गर्भपात रॅकेटने (Abortion racket) राज्यभर खळबळ उडवली आहे. या

Nashik : नाशिकमध्ये लाचखोरीवर एसीबीचा मोठा प्रहार ! १० हजारांची लाच घेताना महिला तलाठी रंगेहात जेरबंद

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील सटाणा (Satana) तालुक्यात लाचखोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, सातबारा उताऱ्यावरील

Gold Rate Today : सराफा बाजारात मोठी उलथापालथ! सोने 4,300 रुपयांनी तर चांदी 10 हजारांनी घसरली; खरेदीदारांना मोठा दिलासा

सोन्या-चांदीच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत असतानाच आज सराफा

Crime News: भाईंदरमध्ये खळबळ! खारफुटीत सापडलेल्या जळालेल्या मृतदेहाच्या प्रकरणाचा उलगडा, तीन सख्खे भाऊ अटकेत

भाईंदर : भाईंदर (Bhayandar) पूर्व परिसरातील खारफुटीच्या जंगलात सापडलेल्या जळालेल्या आणि कुजलेल्या मृतदेहाच्या (Deathbody)