Spice Jet Q4 Results: स्पाईस जेटचा तिमाही निकाल जाहीर कंपनीच्या नफ्यात १२ पटीने वाढ या तिमाहीत करोत्तर नफा ३२४.८७ कोटी

प्रतिनिधी: स्पाईस जेट या विमान कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. कंपनीला मार्च २०२५ तिमाहीत ३२४.८७ कोटींचा करोत्तर नफा (Profit after tax PAT) तिपटीने वाढत ३२४.८७ कोटींवर पोहोचला असल्याचे कंपनीने आपल्या फायलिंग मध्ये म्हटले आहे. कंपनीला २०२४ मधील चौथ्या तिमाहीत ११९ कोटींचा करोत्तर नफा झाला होता जो वाढून ३२४.८७ कोटीवर पोहोचला आहे. लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाहीत ३१९ कोटी रुपयांचा आतापर्यंतचा सर्वाधिक तिमाही नफा नोंदवला आहे, जो तिसऱ्या तिमाहीतील २६ कोटी रुपयांपेक्षा १२ पटीने वाढला आहे.मात्र कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue from Operations) मध्ये इयर ऑन इयर (YoY) बेसिसवर १६ टक्क्याने घसरण झाली आहे. कंपनीच्या २०२४ चौथ्या तिमाहीतील १७१९.३ कोटींच्या तुलनेत घटून १४४६.३७ कोटींवर पोहोचला आहे. कंपनीच्या मागील वर्षातील एकूण ३०० कोटींच्या नुकसानीचा तुलनेत आर्थिक वर्ष २०२५ मधील तिमाहीत २६ कोटीवर नफा पोहोचला होता. विमान प्रवासातील मागणीत वाढ झाल्याने कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत झाली होती.

कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील ७०५० कोटींच्या तुलनेत घट होऊन ५२८४ कोटी वाढ झाली होती. स्पाईसजेट मध्ये आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील तिमाहीत प्रवर्तकांनी(Promoters) ने ५०० कोटींची गुंतवणूक केली होती.आर्थिक वर्ष २०२४- २०२५ साठी, एअरलाइनने ९२४ कोटी रुपयांचा करपूर्व नफा (EBITDA) आणि ६,७३६ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये महसूल ८,४९७ कोटी रुपयांवरून घसरला असला तरी, सुधारित नफा आणि ऑपरेशनल कार्यक्षमता यामुळे हा परिणाम कमी होण्यास मदत झाली.

तिमाही निकालाबाबत बोलताना समुहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह म्हणाले, 'जटिल जागतिक पुरवठा साखळी आणि इंजिन दुरुस्तीच्या आव्हानांमुळे आमच्या बंद विमानांच्या ताफ्याचे पुनरुज्जीवन अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला असला तरी, आता त्याचा वेग स्पष्टपणे वाढत आहे. स्टँडर्डएरो आणि कार्लाइल एव्हिएशन सारख्या जागतिक दर्जाच्या OEM आणि MRO सोबतच्या आमच्या भागीदारी समुहाला फळ देत आहेत तसेच इंजिन दुरुस्तीचे काम सुरू आहे. दुरुस्ती केलेले इंजिन आता परत येत असल्याने, आम्हाला पुढील आठवड्यात ऑपरेशनल क्षमतेत स्थिर वाढ अपेक्षित आहे.'

एअरलाइनने २४ नवीन देशांतर्गत उड्डाणांसह आपले नेटवर्क वाढवले आहे.
Comments
Add Comment

एकनाथ शिंदेंचे विश्वासू मंगेश चिवटेंच्या भावाला बेदम मारहाण

सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे यांचे बंधू आणि शिवसेना जिल्हाप्रमुख

वसईत गॅस पाईपलाईन फुटली

वसई : पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये वसंत नागरी परिसरात शनिवारी चार ऑक्टोबर रोजी सकाळी धक्कादायक घटना घडली.

मुंबई २०३० पर्यंत रेबीजमुक्त करणार, महापालिकेचा निर्धार

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल

HDFC Bank Update: दुसऱ्या तिमाहीत बँकेच्या कर्ज पुरवठ्यात लक्षणीय वाढ

प्रतिनिधी: एचडीएफसी बँकेने आपल्या दुसऱ्या तिमाहीतील आर्थिक माहिती एक्सचेंजला दिली आहे. त्यातील

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द