विमान अपघाताचा व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या १७ वर्षाच्या आर्यनला पोलिसांनी घेतले ताब्यात, प्राथमिक चौकशी होणार

एअर इंडियाचे विमान एआय-१७१ कोसळतानाचा व्हिडीओ काढणाऱ्या आर्यन आसरीला पोलिसांनी घेतले ताब्यात


अहमदाबाद मध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाल्यानंतर काही वेळातच या अपघाताचा (Air India Plane Crash Video)  एक व्हिडीओ समोर आला होता. यामध्ये विमान नागरी वस्तीच्या अगदी जवळून गेल्याचे आणि काही वेळात कोसळल्याचे स्पष्ट दिसत होते. व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्याने विमान अपघाताची वेळ इतकी अचूक कशी काय साधली? याबाबत सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यामुळे आता या प्रश्नांचा उलगडा झाला आहे. कारण हा व्हिडीओ चित्रीत करणाऱ्या आर्यन आसरी (वय १७) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची प्राथमिक चौकशी केली जाणार आहे.



आर्यनला अहमदाबाद पोलिसांनी का ताब्यात घेतले?


एअर इंडिया विमानाचा भीषण अपघात झाल्याचा तो भयावह व्हिडिओ आणि त्याची अचूक वेळ कशी काय साधली गेली, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला होता. कारण हे व्हिडिओ फुटेज कुठल्याही सीसीटीव्ही कॅमेऱ्यातले नसून,  मोबाईलमध्ये चित्रीत केले गेले असल्यामुळे, इतक्या जवळून हा व्हिडिओ कसा काय चित्रीत केला गेला? असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविकच आहे. विमान अपघातासंबंधी प्रत्येक गोष्ट खंगाळून पाहण्यासाठी पोलिस आणि सुरक्षा दल एक एक बाजू तपासून पाहत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, विमान अपघाताचा व्हिडिओ चित्रित करणाऱ्या आर्यनला पोलिसांनी प्राथमिक चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.   तसेच त्याच्याकडून व्हिडीओ रेकॉर्ड करण्याच्या कारणाचा तपास घेतला जाणार असल्याचे सांगितले जाते.


आर्यन गावावरून आपल्या नातेवाईकांच्या घरी आला होता. यादरम्यान त्याने सहजच आकाशात झेपावणाऱ्या विमानाचा व्हिडिओ काढण्यासाठी घराच्या गच्चीवर गेला. त्या दरम्यान एअर इंडियाचे विमान उड्डाण करतानाचा व्हिडिओ तो मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असताना, हा विचित्र अपघात झाल्याचे म्हंटले जाते. हे सहज जरी असले तरी या व्हिडीओमुळे एअर इंडियाच्या भीषण अपघाताचे दृश्य सबंध जगासमोर आले. त्यानंतर विमानतळावरील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील दृश्यही समोर आले होते. मात्र आर्यनच्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड झालेला व्हिडीओ अगदी जवळून आणि स्पष्ट असल्याचे दिसून येते.


व्हायरल झालेला हाच तो व्हिडीओ





आर्यनने सांगितले व्हिडिओमागचे कारण


द लल्लनटॉप या यूट्यूब वाहिनीला आर्यनने मुलाखत दिली असून व्हिडीओ कसा रेकॉर्ड केला याची माहिती दिली. आर्यन हा मुळचा अहमदाबादमधील रहिवासी नाही. तो गावावरून नातेवाईकांच्या घरी आला होता. केवळ उत्सुकतेपोटी आर्यन व्हिडीओ रेकॉर्ड करत होता. विमान जवळून जात असल्याचे व्हिडीओ गावातील मित्रांना दाखवायचे होते, त्यामुळे आपण रेकॉर्ड करत होतो, असे त्याने सांगितले.



आर्यनने घेतला अपघाताचा धसका


आर्यनच्या बहिणीने माध्यमांना माहिती देताना सांगितले की, आर्यन उत्सुकतेपोटी व्हिडीओ काढत होता. मात्र जसा विमानाचा स्फोट झाला, तेव्हा त्याने व्हिडीओ रेकॉर्डिंग बंद केले. स्फोट झाल्यामुळे तो खूप घाबरला. तसेच आर्यनने सांगितले की, विमान आकाशात उडताना पाहून त्याला कुतूहल वाटत होते. मीही एकदिवस विमानात बसेल, अशी स्वप्न तो पाहत होता. मात्र जेव्हा विमानाचा स्फोट होताना त्याने पाहिले, तेव्हापासून तो विमानात कधीही बसणार नाही, असे म्हणत आहे. आता पोलिसांनी आर्यनला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या शेजारच्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आर्यन गावावरून आला असल्यामुळे त्याच्यासाठी विमान उडताना पाहणे नवीन होते, म्हणून तो व्हिडीओ काढत असल्याचे शेजाऱ्यांनीही सांगितले. तसेच स्फोट झाल्यानंतर आम्हाला आवाज ऐकू आला नाही. मात्र नंतर काळ्या धुराचे लोट दिसू लागल्यावर स्फोट झाल्याचे कळले, असेही ते पुढे म्हणाले.

Comments
Add Comment

दिल्ली विमानतळावरुन एकाच फॉर्च्युनरमधून मोदी आणि पुतिन रवाना

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. नवी

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास

भाडेकरूंना दिलासा! घरभाड्याबाबत नवा निर्णय लवकरच होणार लागू, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमतीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली असल्याने देशातील लाखो लोक

Doctor Death News : युवा डॉक्टरांचे स्वप्न भंगले; भरधाव कारची ट्रकला धडक, वेगामुळे झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी अंत

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यामध्ये बुधवारी (३ डिसेंबर २०२५) रोजी एक हृदय पिळवटून टाकणारी आणि

८७ बेकायदेशीर 'लोन ॲप'वर कारवाई : केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : डिजिटल फसवणुकीचे वाढते प्रमाण आणि अवैध ऑनलाइन कर्ज व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी बांधकामात मशि‍दीचा अडथळा

कोलकाता: सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक असणाऱ्या कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ