Lalbaugcha Raja 2025 : 'लालबागच्या राजाचा विजय असो', लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न!

यंदाचे लालबागच्या राजाचे ९२ वे वर्ष


मुंबई : "ही शान कोणाची लालबागच्या राजाची"...हे वाक्य ऐकण्यासाठी आता काही दिवसचं राहिले आहेत. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरलेले असतानाच मुंबईत मंडळांची लगबग सुरु झाली आहे. यंदाचे लालबागच्या राजाचे ९२ वे वर्ष आहे. सर्व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या राजाचा आज पाद्यपूजन सोहळा थाटात पार पडला. लालबागच्या राजाचे गणेश मुहूर्त पूजन आज मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते सकाळी ६ वाजता लालबागच्या राजाचे मूर्तिकार कांबळी आर्ट्स यांच्या कार्यशाळेत पार पडले. गणेश मुहूर्त पूजनासोबत पार पडलेल्या या सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत. यावेळी मंडळाचे खजिनदार मंगेश दत्ताराम दळवी यांच्या हस्ते लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पावती पुस्तकांचेही पूजन झाले. यावर्षी गणेशचतुर्थी २७ ऑगस्ट २०२५ ते अनंत चतुर्दशी ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत साजरी होणार आहे.



मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपती अशी लालबागचा राजाची ओळख आहे. याआधी लालबागच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळा हा आकर्षणाचा विषय होता. खऱ्या अर्थाने मुंबईतल्या गणेशोत्सवाची सुरुवात लालबागच्या राजाच्या पाद्यपुजनाने होते. गणेशोत्सवाला काही दिवस उरलेले असताना संकष्टीच्या मुहूर्तावर हा पाद्यपूजन सोहळा पार पडायचा. या पाद्यपूजन सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहत होते. मात्र आता गेल्या काही वर्षांपासून लालबागचा राजा मंडळाने हा पाद्यपूजन सोहळा मूर्तीकाराच्या कार्यशाळेत अत्यंत सध्या आणि सोप्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार संकष्टीच्या मुहूर्तावर शनिवारी मंडळाचे अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मूर्तीकार संतोष कांबळी यांच्या कार्यशाळेत लालबागच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळा पार पडला.



जगभरात लालबागच्या राजाची ख्याती आहे. विशेष म्हणजे या गणपतीच्या मंडळाचा आगमन सोहळा नसतो. या मूर्तीची ज्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा केली जाते त्याच ठिकाणी घडवली जाते. अशातच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे झाडून तयारीला लागली आहेत. पण मुंबईतील नव्हे तर जगभरात प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळ्याने गणेशोत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे.

Comments
Add Comment

स्मार्टफोनवर येणार ९ नवीन इमोजी

युनिकोड १८.० अपडेटमध्ये नव्या इमोजींचा समावेश आजच्या डिजिटल जगात आपण शब्दांपेक्षा इमोजीचा वापर अधिक करतो.

बहुभाषिक चेहऱ्यातही मराठी टक्का भक्कम

मुंबई : महापालिकेच्या निकालाचे आकडे मुंबईच्या बदलत्या राजकीय आणि सामाजिक समीकरणावर शिक्कामोर्तब करीत आहेत.

‘एमआयएम’चे तेलंगणात ६७, तर महाराष्ट्रात शंभरहून अधिक नगरसेवक…

मुंबई : ‘एमआयएम’ या पक्षाचे आता तेलंगणापेक्षा महाराष्ट्रात अधिक नगरसेवक आहेत. तेलंगणामध्ये केवळ ६७ नगरसेवक

मुंबई महापालिकेत महिला नगरसेवकांचे स्पष्ट बहुमत!

२२७ प्रभागांमध्ये १३० नगरसेविका विजयी मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण

मुंबईत ८७ हजार मतदारांची ‘नोटा’ला पसंती

मुंबई महापालिकेत पाचव्या क्रमाकांवर नोटाला मतदान मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत यंदा अनेक

महापौरपदासाठी भाजप-शिवसेनेतच खरी चुरस!

महापौरांच्या खुर्चीवर पिठासिन अधिकारी म्हणून श्रद्धा जाधव यांच्या नावाची चर्चा मुंबई : महापौरपदाचे आरक्षण