
प्रतिनिधी: ओसवाल पंप्स लिमिटेड (Oswal Pumps Limited) कंपनी आयपीओला (IPO) पहिल्या दिवशी ४२ टक्क्याने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. पहिल्या दिवशी ४२% बिडींग झाल्या आहेत. विशेषतः विना संस्थात्मक गुंतवणूकदार (Non Institutional Investors NII) कडून समाधानकारक प्रतिसाद या आयपीओला पहिल्या दिवशी मिळाला आहे. विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून या आयपीओला ७९% सबस्क्रिप्शन मिळाले आहे. तर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून कंपनीला ८% सबस्क्रिप्शन मिळाले आहे. कंपनीकडून ५८४ ते ६१४ रुपये प्राईज बँड निश्चित करण्यात आला होता.
कंपनीकडून ८९० कोटींच्या समभागांचा फ्रेश इश्यू (Equity Shares) लोकांना गुंतवणूकीसाठी ठेवण्यात आला होता तर ८१ लाखांचे समभाग ऑफर फॉर सेल (OFS) म्हणून ठेवण्यात आले होते. एकूण १३८७.३४ कोटींचा हा आयपीओ होता. एनएसई (NSE) माहितीनुसार या आयपीओसाठी ६७८३५५२ बिड प्राप्त झाल्या होत्या.ऑफर फॉर सेलसाठी १६२१२९८० शेअर्सचे बिडिंग आयपीओला मिळालेले आहे.

प्रतिनिधी: परवापासून गुंतवणूकदारांसाठी बाजारात नवीन आयपीओ दाखल होत आहे.ओसवाल पंप्स लिमिटेड (Oswal Pumps Limited) या कंपनीचा आयपीओ (IPO) बाजारात १३ जूनपासून दाखल होत ...
कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, या आयपीओतील निधीचा वापर भांडवली खर्च (Capital Expenditure), नवीन प्रकल्प तसेच दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे. १७ तारखेला गुंतवणूकदारांना गुंतवणूकीची शेवटची संधी असेल १३ ते १७ जून कालावधीत हा आयपीओ सर्वसामान्यांसाठी खुला असणार आहे.
२००३ मध्ये स्थापन झालेली ओसवाल पंप्स लिमिटेड ही पंपांची उत्पादक आणि वितरक आहे. ही कंपनी घरगुती, कृषी आणि औद्योगिक अनुप्रयोगांसाठी विविध प्रकारच्या उत्पादनांची ऑफर देते ज्यामध्ये सौर पंप, सबमर्सिबल पंप, मोनो ब्लॉक पंप, प्रेशर पंप, सांडपाणी पंप, इलेक्ट्रिक मोटर्स, सबमर्सिबल वाइंडिंग वायर आणि केबल्स आणि इलेक्ट्रिक पॅनेल यांचा समावेश आहे.