Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत थोडक्यात बचावली अकोल्याची ऐश्वर्या

अकोला: गुजरातच्या अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत 240 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. हे विमान एका वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलवरही कोसळल यामध्ये सुद्धा काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मात्र अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल ही विद्यार्थिनी प्रसंगावधान राखत या अपघातातून थोडक्यात बचावली आहे. मृत्यू तिने जवळून पहिला. पण म्हणतात ना ‘देव तारी त्याला कोण मारी’ हे ऐश्वर्याने तिच्यावर बेतलेल्या दुर्दैवी प्रसंगातून प्रत्यक्ष अनुभवले.


अकोल्यातील दुर्गा चौक येथील रहिवासी ऐश्वर्या तोष्णीवाल ही वसतिगृहाच्या दुसऱ्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर झोपली होती तेव्हा हा अपघात झाला.  या भयानक घटनेबद्दल बोलताना ऐश्वर्याने सांगितले की, "हा माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक अनुभव होता, जो मी कधीही विसरणार नाही." तिने पाचव्या मजल्यावरील धुरातून स्वतःला बाहेर काढून आणि स्वतःभोवती ब्लँकेट गुंडाळून आपला जीव वाचवला.  अचानक, मोठा आवाज झाला आणि सर्वत्र धूर पसरला. तरीही, दाट धुरातून मार्ग काढत ऐश्वर्या पाचव्या मजल्यावरून खाली उतरत आली. 


ऐश्वर्याने बिल्डिंगच्या खाली असलेल्या 6 फूट उंच भिंती ओलांडून बाहेर पडण्याचा तीन वेळा प्रयत्न केला. मात्र तिचे  प्रयत्न निष्फळ ठरले. परंतु मुळातच जिद्दी ऐश्वर्याने हार मानली नाही. परत प्रयत्न केला आणि ती चौथ्यांदा यशस्वी झाली. बिल्डिंगच्या बाहेर येताच तीने एक ऑटोरिक्षा थांबवून स्वतः रुग्णालयात गेली. या दुर्घटनेत ऐश्वर्या किरकोळ जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. हा संपूर्ण थरारक ऐश्वर्याचे वडिल अमोल तोष्णीवाल यांनी कथन केला.


अकोल्यातील तोष्णीवालच्या कुटुंबातील एका सदस्याने सांगितले की, "ऐश्वर्या अहमदाबादच्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेजमध्ये डीएम ऑन्कोपॅथॉलॉजीच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. ती तिच्या आजोबांचा वाढदिवस साजरा करून अकोल्याहून अहमदाबादला परतली होती. झोपेत असताना अचानक मोठ्या आवाजाने तिला जाग आली." "जेव्हा ती जागी झाली तेव्हा सर्वत्र धूर होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ऐश्वर्याने स्वतःला ब्लँकेटमध्ये गुंडाळले आणि अंधार आणि धुरातून मार्ग शोधून पाचव्या मजल्यावरून खाली उतरून तिचा जीव वाचवला. ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर, हातावर आणि पायांवर जळण्याच्या खुणा होत्या," असे कुटुंबातील सदस्याने सांगितले.


घाबरलेल्या ऐश्वर्याने ताबडतोब तिचे वडील अमोल तोष्णीवाल यांना फोन केला, जे त्यावेळी अकोल्यातील दुर्गा चौकात त्यांच्या साडीच्या दुकानात होते. मुलीचा फोन येताच त्यांना धक्का बसला आणि ते दुकान बंद करून लगेच घरी गेले. अमोल तोष्णीवाल म्हणाले, "टीव्हीवर बातम्या पाहिल्यावर आम्हाला धक्का बसला. पण देवाच्या कृपेने आमची मुलगी इतक्या मोठ्या अपघातातून वाचली." ऐश्वर्याची आई माधुरी तोष्णीवाल आणि तिच्या आजी-आजोबांनी अश्रू ढाळत देवाचे आभार मानले. आजोबा म्हणाले, "आमची नात माझ्या वाढदिवसासाठी आली होती, पण तिला अशा अपघाताला सामोरे जावे लागले. ती सुरक्षित आहे याबद्दल मी देवाचे शंभर वेळा आभार मानतो." अपघातात जखमी आणि मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल धक्का बसलेल्या तोष्णीवाल कुटुंबाने शोक व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम! भारताचा रशियाकडून तेल खरेदीवर तात्पुरत्या बंदीचा निर्णय

नवी दिल्ली: अमेरिकेने रशियातील दोन प्रमुख तेल कंपन्या रोझनेफ्ट आणि लुकोइल यांच्यावर नव्या आणि कठोर निर्बंधांची

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ; ८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठूभक्ताची पंढरपूर वारी

बेळगाव : पौराणिक कथेत श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना कावड करुन तिर्थयात्रेला घेऊन जात होता. मात्र अलिकडची काही

जम्मू काश्मीरमधून राज्यसभेसाठी नॅशनल कॉन्फरन्सने तीन तर भाजपचा एका जागेवर विजय

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने ३ जागांवर

देशात लवकरच सुरू होणार 'भारत टॅक्सी' सेवा; केंद्र सरकारच्या सहकार विभागाचे मोठे पाऊल

मुंबई : ॲप आधारित टॅक्सी सेवेत ओला आणि उबरसारख्या खाजगी कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी केंद्र

दिवाळी रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१,००० हून अधिक जणांना दिली नोकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली.

मतदारांसाठी निवडणूक आयोगाचे नवे नियम; गरजेच्या किमान सुविधा देणे बंधनकारक

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे.