Israel Iran War: इस्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने डागले तेल अवीववर १५० हून अधिक क्षेपणास्त्रे, अनेकजण गंभीर जखमी

अमेरिकन सैन्याने इस्रायलकडे जाणारी इराणी क्षेपणास्त्रे पाडण्यास केली मदत 


तेल अवीव: शुक्रवारी रात्री इराणने इस्रायलवर हवाई हल्ले करून  १५० अधिक क्षेपणास्त्राचा वर्षाव केला. ज्यामध्ये इस्रायलचे दोन सर्वात मोठी शहरे जेरुसलेम आणि तेल अवीवमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले. एएनआयने द टाइम्स ऑफ इस्रायलचा हवाला देत म्हटले आहे की आतापर्यंत इराणने इस्रायलवर दोन फेऱ्यांमध्ये सुमारे १५० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत.


हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने शुक्रवारी रात्री इस्रायलवर हवाई हल्ले करून प्रत्युत्तर दिले,  इस्रायलने आपल्या जुन्या शत्रूविरुद्ध आतापर्यंतचे सर्वात मोठे लष्करी आक्रमण सुरू केल्यानंतर त्याला उत्तर म्हणून इराणकडून हा हल्ला झाला आहे. यादरम्यान इस्रायलमध्ये नागरिकांसाठी हवाई हल्ले सायरन सतत वाजत होते.


टाईम्स ऑफ इस्रायलच्या मते, नऊ ठिकाणी हल्ला केल्याची नोंद झाली आहे, ज्यामध्ये सुमारे १५ लोक जखमी झाले आहेत,



इराणने १०० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली


इस्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार इराणने १०० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आणि त्यापैकी बहुतेक अडवण्यात आली किंवा त्यांची रेंज कमी पडली. दोन अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की अमेरिकन सैन्याने इस्रायलकडे जाणारी इराणी क्षेपणास्त्रे पाडण्यास मदत केली.



हल्ल्यात दोन सामान्य नागरिक गंभीर जखमी


इस्रायलच्या चॅनल १२ ने म्हटले आहे की या हल्ल्यात दोन सामान्य नागरिक गंभीर जखमी झाले आहेत, तर ३४ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. या हल्ल्यात तेल अवीवजवळील रमत गान येथील निवासी परिसरातील एका अपार्टमेंट ब्लॉकसह अनेक इमारतींना नुकसान झाले आहे. मध्य तेल अवीवमधील आणखी एका इमारतीवरही हल्ला करण्यात आला आहे, ज्यामुळे अनेक मजल्यांचे मोठे नुकसान झाले आहे.



हल्ल्याबाबत खामेनी यांचे विधान 


इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी शनिवारी सांगितले की इराणचे सशस्त्र दल इस्रायलचा सामना करण्यास सज्ज आहेत. त्यांनी एक्स वर लिहिले की, "इस्रायली राजवटीने मोठी चूक केली आहे. त्यांनी एक बेपर्वा कृत्य केले आहे.  त्याचे परिणाम त्या राजवटीला उद्ध्वस्त करतील."  त्यांनी पुढे असे देखील म्हंटले आहे की, आमचे सशस्त्र दल तयार झाले आहेत आणि देशाचे अधिकारी व सर्व जनता सशस्त्र दलांच्या मागे आहेत. इराणी राष्ट्र निश्चितच आपल्या मौल्यवान शहीदांच्या रक्ताचा बदला घेईल आणि आपल्या हवाई क्षेत्राच्या उल्लंघनाकडे दुर्लक्ष करणार नाही.

Comments
Add Comment

तब्बल ५ हजार ५०० किलो वजनाची सोन्याची बुद्ध मूर्ती!

थायलंड  : बुद्धांचे अनुयायी जगभरात अब्जावधींच्या संख्येने आहेत, जे अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत. भगवान

मेट्रोत झोपलात, तर भरावा लागेल हजारोंचा दंड!

दुबई  : दररोज असंख्य लोक रेल्वेप्रमाणेच मेट्रोने प्रवास करतात आणि प्रवास म्हटलं की थोडी झोप आलीच. पण मेट्रो

‘मांजरांचे बेट’ अशी ओळख असलेलं अनोखं ठिकाणं

टोकियो  : जगात अनेक रहस्यमय आणि अनोखी ठिकाणे आहेत; पण जपानमधील एका बेटाने आपल्या वैशिष्ट्यांमुळे पर्यटकांना

भारतीय युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यावसायिक अनुभवाची संधी! युनेस्कोचा इंटर्नशिप प्रोग्राम, आताच करा अर्ज

भारतीय युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. युनेस्कोने

भारतानंतर आता अफगाणिस्तान पाकिस्तानचे पाणी अडवणार!

काबूल : भारतानंतर आता तालिबानशासित अफगाणिस्तान पाकिस्तानला होणारा पाणीपुरवठा मर्यादित करण्याची आणि नदीवर धरणे

रशियातील महत्त्वाच्या दोन तेल कंपन्यांवर ट्रम्पचे निर्बंध, रशियावर येणार आर्थिक दबाव! भारतालाही बसणार का फटका?

अमेरिका: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावर आर्थिक दबाव आणण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.