जळालेले मालवाहक जहाज टो करुन सुरक्षित ठिकाणी हलवले

  78

कोची : सिंगापूरचा झेंडा लावलेले एमव्ही वान है ५०३ हे जहाज भारताच्या तटरक्षक दलाने टो करुन सुरक्षित ठिकाणी हलवले. याआधी सतत पाण्याचा मारा करुन तसेच जहाजावर विशिष्ट रासायनिक पावडरचा मारा करुन मालवाहक जहाजाची आग नियंत्रणात आणण्यात आली. यानंतर तटरक्षक दलाने जळालेले मालवाहक जहाज टो करुन सुरक्षित ठिकाणी हलवले. अर्धवट जळालेल्या जहाजातून काही कंटेनर समुद्रात पडले आहेत. या कंटेनरना शोधून समुद्राबाहेर काढण्याचे काम सुरू आहे. तसेच कंटेनरमधील घटकांमुळे पाण्यात घातक रसायने मिसळू नये याची खबरदारी घेण्याचे काम सुरू आहे.

जळालेल्या मालवाहक जहाजावर २२ जण होते. यापैकी १८ जणांना भारताने वाचवले. जहाजावरील चार जण बेपत्ता आहेत. बेपत्ता असलेल्यांचा शोध सुरू आहे.

कोचीपासून सुमारे वीस सागरी मैलांवर असलेल्या जहाजाला ६०० मीटर लांबीच्या दोरखंडाने टो करण्यात आले अर्थात ओढण्यात आले आणि जहाज सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.

नियमानुसार जहाज मालक आणि विमा कंपनी यांच्यात चर्चा होईल. यानंतर जहाज ज्या देशाच्या सागरी हद्दीत आहे त्या देशाला म्हणजेच भारताला माहिती दिली जाईल. यानंतर मालकाकडून ताबा घेतला जाईपर्यंत जळालेले जहाज भारतीय सागरी हद्दीत देखरेखीत, सुरक्षित ठिकाणी राहील.

अर्धवट जळालेल्या मालवाहक जहाजामुळे भारतीय किनारपट्टीचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. सध्या जहाज भारतीय किनाऱ्यापासून ३५ सागरी मैलांवर सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
Comments
Add Comment

'या' अल्पसंख्यांकांना पासपोर्टशिवाय भारतात राहण्याची मुभा

नवी दिल्ली : पाकिस्तान, अफगानिस्तान आणि बांगलादेश येथून भारतात आलेल्या हिंदू, शीख, ख्रिस्ती, बौद्ध, जैन आणि पारशी

चेक बाउन्स प्रकरणातील दोषीला तुरुंगवास टाळता येणार

नवी दिल्ली : चेक बाउन्सच्या (चेक वटणं) गुन्ह्यात दोषी ठरलेल्या व्यक्तीला सुनावण्यात आलेली तुरुंगवासाची शिक्षा

नेपाळ, भूतानमधील नागरिकांना व्हिसा-पासपोर्टची गरज नाही!

नवी दिल्ली : नेपाळ आणि भूतानमधील नागरिकांना रस्ते किंवा हवाई मार्गाने भारतात प्रवेश करताना पासपोर्ट किंवा

विक्रमादित्य वैदिक घड्याळाचे उज्जैनमध्ये अनावरण

उज्जैन : बहुचर्चित विक्रमादित्य वैदिक घड्याळ आणि मोबाइल ॲपचे अनावरण मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव

भारतासोबत सेमीकंडक्टरचे भविष्य घडवण्यास जग तयार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : जगाची शक्ती सेमीकंडक्टर चिप्समध्ये एकवटली;पूर्वी तेलाच्या विहिरीद्वारे भविष्य ठरायचे, एक दिवस जग

शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक!

नवी दिल्ली : शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी)उत्तीर्ण करणे आता शिक्षकांसाठी बंधनकारक आहे, असा मोठा निर्णय सोमवारी