Wednesday, September 10, 2025

हिंदवी पाटीलला अश्रू अनावर; सह्याद्री अमृततुल्यावर PMC ची कारवाई!

हिंदवी पाटीलला अश्रू अनावर; सह्याद्री अमृततुल्यावर PMC ची कारवाई!

पुणे : प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा हिंदवी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, मात्र यावेळी कारण काहीसे दुःखद आहे. पुण्यातील तिच्या 'सह्याद्री अमृततुल्य' या दुकानावर पुणे महानगरपालिकेने (PMC) अनपेक्षितपणे कारवाई केली. यामुळे भावूक झालेल्या हिंदवी पाटीलला अश्रू अनावर झाले.

हिंदवीने माध्यमांशी बोलताना सांगितले की, कोणतीही पूर्वकल्पना किंवा नोटीस न देता थेट कारवाई करण्यात आली. दुकानातील साहित्य, बोर्ड्स हटवण्यात आले आणि व्यवसायावर अचानक परिणाम झाला.

https://x.com/PrahaarNewsline/status/1933894985906094366

"मी या दुकानावर मनापासून मेहनत घेतली होती, अनेक महिलांना काम दिलं होतं. एक नोटीस दिली असती तरी समजून घेतलं असतं… पण ही थेट कारवाई मनाला चटका लावणारी आहे," असं म्हणत हिंदवीने आपली भावना व्यक्त केली.

हिंदवी पाटील ही केवळ एक यशस्वी लावणी नृत्यांगणा नसून, गेल्या काही महिन्यांपासून ती उद्योजिका म्हणूनही कार्यरत आहे. ‘सह्याद्री अमृततुल्य’ हे तिचं चहा केंद्र पुण्यातील विविध ठिकाणी लोकप्रिय ठरत होतं.

या प्रकरणानंतर PMC कडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र सोशल मीडियावर याप्रकरणाची मोठी चर्चा सुरू आहे, आणि अनेक चाहत्यांनी हिंदवीला पाठिंबा दर्शवला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >