Saturday, July 5, 2025

Malegaon Sugar Factory Election : ​'माळेगाव'च्या निवडणुकीत​ चौरंगी लढत!

Malegaon Sugar Factory Election : ​'माळेगाव'च्या निवडणुकीत​ चौरंगी लढत!

​ पुन्हा 'पवार' काका- पुतणे भिडणार


बारामतीच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते खा. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे काका- पुतणे​ पुन्हा एकदा समोरासमोर एकमे​कां​शी भिडणार आहेत.​ ​स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ही निवडणूक होत आहे. मात्र ​शरद पवार यांच्या पॅनेलने ब वर्ग गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात मात्र उमेदवार दिलेला नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.


?si=HxnxKK-CQXAQvp9Q

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी २१ जागांसाठी ९० उमेदवार रिंगणात उतरले आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी ​म्हणजे गुरुवारी ​ अजित पवार यांच्या श्री नीलकंठेश्वर पॅनेल आणि शरद पवार यांच्या बळीराजा शेतकरी बचाव पॅनेलने आपले उमेदवार जाहीर केले. यासह चंद्रराव तावरे व रंजन तावरे या गुरू-शिष्यांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनेलने देखील उमेदवार जाहीर ​केले आहेत. ​कष्टकरी शेतकरी पॅनेल​च्या उमेदवारांसह काही अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.​ त्यामुळं माळेगाव साखर कारखान्यांची निवडणूक चौरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ​


माळेगाव साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. चिन्हवाटप ​झाली आहेत. आता प्रचारासाठी केवळ ८ दिवसांचा कालावधी आहे. ​दोन दिवसापूर्वी ​ म्हणजे गुरुवारी ​ सहकार बचाव शेतकरी पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ​ निरा वागज येथील जाहीर सभेने​ ​झाला आहे. तर ​ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्री नीलकंठेश्वर पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ ​ शनिवारी​ होणार आहे.​ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कँाग्रेस पक्षाला तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह मिळाले आहे. तर अजित पवार यांच्या श्री नीलकंठेश्वर पॅनेलला कप-बशी चिन्ह मिळालेआहे. ​ माळेगाव साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये चौरंगी लढत होत असून, संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेली ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार, हे मात्र निश्चित.

Comments
Add Comment