
नगरसेवकांची ११५ संख्या कायम
विरार : पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागरचना करण्याचे आदेश नगर विकास विभागाने दिले आहेत. त्यानुसार आता प्रभागांची रचना करण्यात येणार असून, पालिकेच्या ११५ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी २९ प्रभागांची रचना करण्यात येणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र मानिव लोकसंख्येच्या आधारे वाढविलेल्या प्रभाग संख्येनुसार या निवडणुका घ्याव्यात की जुन्या प्रभाग संख्येनुसार यासंदर्भात कोणतेही स्पष्ट निर्णय देण्यात आलेले नव्हते.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने प्रभागांची रचना कशा प्रकारे करण्यात यावी यासंदर्भात परिपत्रक काढून जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

एका उंदराने केले संपूर्ण शहराचे पाणीबंद, लोकांचे झाले मोठे हाल
चक्क एका उंदरामुळे संपूर्ण संभाजीनगरचा पाणीपुरवठा तब्बल 7 तास बंद झाला होता. संभाजीनगर: उंदरामुळे काय घडेल आणि काय नाही याचा नेम नाही. अलिकडेच ...
वसई-विरार महापालिका 'क' वर्गामध्ये मोडत असल्याने येथील प्रभागांची रचना महापालिका आयुक्तांकडून केल्या जाणार आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला मान्यता गृहीत धरून वसई-विरार शहर महानगरपालिकेने आरक्षित प्रभागांची जाहीर सोडत २१ मे २०२२ रोजी काढली व प्रभागनिहाय आरक्षण प्रसिद्ध करून त्यावर १ जून ते ६ जून २०२२ या कालावधीमध्ये हरकती व सूचना मागविण्यात आल्या. त्यानंतर १३ मे २०२२ रोजी पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ आरक्षणाची अधिसूचना महापालिकेने प्रसिद्ध केली. या अधिसूचनेत ओबीसीं प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित ठेवण्यात आलेली नव्हती. मात्र सदस्य संख्या ११ ने वाढवून १२६ करण्यात आली होती, तर २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकीत ३१ जागा ओबीसींसाठी राखीव होत्या त्यापैकी १६ जागा या महिलांसाठी
राखीव होत्या.
ही निवडणूक ११५ सदस्यांसाठी घेण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता ओबीसी जागांचा मुद्दा निवडणुकीसाठी निकाली निघाला आहे. त्याचप्रमाणे आता चार सदस्यांचा एक प्रभाग अशाप्रकारे वसई-विरार पालिकेच्या निवडणुकीसाठी २९ प्रभागांची रचना करण्यात येणार आहे. त्या आनुषंगाने महापालिकेत बैठकांचे सत्र सुरूझाले आहे.