अहमदाबाद : एअर इंडियाच्या अहमदाबाद - लंडन मार्गावर असलेल्या AI 176 विमानाला गुरुवार १२ जून रोजी दुपारी अपघात झाला. अपघातात बोईंगचे 787 - 8 ड्रीमलायनर विमान कोसळले. विमानातील २४२ जणांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. विमान जिथे कोसळले त्या भागातील काही नागरिकांचाही मृत्यू झाला. यामुळे मृतांची एकूण संख्या २६५ झाली. काही जण जखमी झाले. तपास पथकाने विमानातील डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर अर्थात डीव्हीआर मिळाल्याचे सांगितले आहे.
What is a MAYDAY Call : 'मेडे' कॉल म्हणजे नेमकं काय? अहमदाबाद विमान दुर्घटनेतील 'शेवट'चा संदेश
गुजरातच्या अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी एक विमान दुर्घटना घडली. एयर इंडियाचे AI-१७१ हे लंडनला जात असलेले बोईंग ७८७ - ८ ड्रीमलायनर विमान उड्डाण ...
विमानातील एक प्रवासी वाचला. सध्या या प्रवाशावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाचलेल्या प्रवाशाची प्रकृती स्थिर आहे. अपघाताची माहिती मिळताच तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. एनडीआरएफच्या सहा पथकांनी स्थानिक अग्निशमन दलाच्या सहकार्याने मदतकार्य सुरू केले. विमानामुळे लागलेली आग विझवण्यात आली आहे. इमारतीची पडझड झाल्यामुळे निर्माण झालेला ढिगारा उपसून सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच मृतांचे पार्थिव पंचनामा आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, नागरी विमान वाहतूक मंत्री आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री, गुजरातचे मुख्यमंत्री, एअर इंडिया कंपनीचे अधिकारी आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच जखमींची विचारपूस केली आणि मृतांच्या नातलगांचे सांत्वन केले. टाटा समुहाने जखमींच्या उपचारांचा खर्च करणार असल्याचे तसेच मृतांच्या नातलगांना एक - एक कोटी रुपयांची मदत देणार असल्याचे जाहीर केले. या पार्श्वभूमीवर गुरुवार १२ जूनच्या दुपारपासून आतापर्यंत विमान अपघाताशी संबंधित नेमक्या काय महत्त्वाच्या घटना घडल्या ते थोडक्यात जाणून घेऊ...
Air India Plan Crash: अपघातग्रस्त एअर इंडियाच्या विमानाचा डीव्हीआर सापडला
विमान अपघाताच्या शेवटच्या क्षणी काय चालले होते? याचे रहस्य उलगडणार
अहमदाबाद: अहमदाबादमध्ये दुर्दैवी अपघात झालेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या ...
डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर : तपास पथकाने विमानातील डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर अर्थात डीव्हीआर मिळाल्याचे सांगितले.
Sumit Sabharwal : कॅप्टन सुमित सभरवालचा बाबांना अखेरचा कॉल, निवृत्त होऊन वडिलांची सेवा करण्याची इच्छा अपूर्ण
८८ वर्षीय वडिलांवर दुःखाचा डोंगर
अहमदाबाद : अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या अपघातग्रस्त विमानाचे कॅप्टन सुमीत सभरवाल यांची निवृत्त होऊन वडिलांची सेवा ...
अहमदाबाद पोलिसांनी दिलेली माहिती : विमानातील २४२ जणांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. विमान जिथे कोसळले त्या भागातील २४ नागरिकांचाही मृत्यू झाला. यामुळे मृतांची एकूण संख्या २६५ झाली.
Ahmedabad Plane Crash : 'सुप्रभात आई...'अपघातापूर्वी केबिन क्रू मेंबर दीपक पाठकचा घरी अखेरचा फोन
अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथे काल (१२ जून) झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. यात विमानातील २४१ प्रवासी तर विमान ...
एक प्रवासी वाचला : विमानातील २४२ जणांपैकी 11A आसनावर बसलेला रमेश विश्वासकुमार नावाचा प्रवासी वाचला. हा प्रवासी किरकोळ जखमी आहे. सध्या या प्रवाशावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाचलेल्या प्रवाशाची प्रकृती स्थिर आहे.
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेत डोंबिवलीच्या लेकीचा मृत्यू!
अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील मेघानी परिसरात काल दुपारी (१२ जून) एअर इंडियाचे विमान कोसळून भीषण अपघात झाला. त्यावेळी विमानात २४२ प्रवासी होते. या ...
टाटा समुहाचे प्रसिद्धीपत्रक : आम्हाला जे दुःख होत आहे ते शब्दात व्यक्त करता येणार नाही. दुर्घटनेत जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला टाटा ग्रुप १ कोटी रुपयांची मदत करेल. जखमींचा वैद्यकीय खर्चही आम्ही करू. त्यांना आवश्यक ती सर्व मदत करू. बी. जे. मेडिकलच्या वसतिगृहाच्या बांधकामात मदत करू. या अकल्पनीय काळात आम्ही बाधित कुटुंबे आणि समुदायांसोबत उभे राहण्यास दृढ आहोत. - एन चंद्रशेखरन अध्यक्ष, टाटा सन्स
विजय रुपाणी आणि 1206 क्रमांकाचे अनोखे कनेक्शन
अहमदाबाद : ज्या आकड्यांनी भाग्य उजळले त्याच आकड्यांसोबत आयुष्य संपले... ऐकायला अजब वाटेल पण हा प्रकार गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी ...
एअर इंडियाचे प्रसिद्धीपत्रक : अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणाऱ्या AI 171 विमानाला गुरुवार १२ जून २०२५ रोजी दुपारी अपघात झाला. तब्बल १२ वर्षे जुने बोईंग ७८७-८ विमान अहमदाबादहून दुपारी १.३८ वाजता निघाले होते, त्यात २३० प्रवासी आणि १२ कर्मचारी होते. उड्डाणानंतर लगेचच विमान कोसळले. आम्हाला कळवताना दुःख होते की, २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला आहे. एकमेव वाचलेल्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रवाशांमध्ये १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, ७ पोर्तुगीज नागरिक आणि १ कॅनेडियन नागरिक आहे. वाचलेली व्यक्ती भारतीय वंशाची ब्रिटिश नागरिक आहे.
मुलाला भेटायला निघाले आई वडील; काळाने घातला घाला
अहमदाबाद : एअर इंडियाचे AI 171 हे विमान अहमदाबादहून लंडनला निघाले. मात्र, टेकऑफच्या काही मिनिटांमध्येच कोसळले. या विमानातून तब्बल २४२ लोक प्रवास करत होते. ...