'ऊत' चित्रपटातून नवी जोडी रुपेरी पडद्यावर

मुंबई :  व्यवस्थेविरुद्ध केलेल्या संघर्षाची कहाणी सांगणारा वेरा फिल्म्स निर्मित आणि राम मलिक लिखित-दिग्दर्शित 'ऊत' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात एक संघर्ष कथा पहायला मिळणार आहे. या सोबतच 'ऊत' मध्ये एक प्रेमकथाही आहे. या प्रेमकथेचा नायक अभिनेता राज मिसाळ असून, अभिनेत्री आर्या सावे ही नायिका आहे. चित्रपटाच्या निमित्ताने ही नवी जोडी मराठी रुपेरी पडद्यावर दाखल झाली आहे. या चित्रपटाचा शानदार पोस्टर अनावरण सोहळा अभिनेते प्रसिद्ध मकरंद देशपांडे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी मंचावर चित्रपटातील सर्व कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते.



चित्रपटाला शुभेच्छा देताना अभिनेता मकरंद देशपांडे म्हणाले की, ‘चित्रपट करणं हे कसब आहे. अनेकांची मेहनत यात असते. या चित्रपटासाठी मला विचारणा झाली होती पण काही कारणास्तव या चित्रपटात काम करण्याचा माझा योग जुळून आला नव्हता. पण आज या चित्रपटाचे पोस्टर अनावरण माझ्या हस्ते झाले आणि या चित्रपटासोबत जोडला जाण्याचा योग जुळून आला, याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी बोलताना अभिनेता राज मिसाळ म्हणाले की, माझा बॅकस्टेज पासून सुरु झालेला प्रवास आज चित्रपटाच्या प्रदर्शनापर्यंत येऊन पोहचला आहे. या प्रवासात साथ दिलेल्या सर्वांचे मी आभार मानतो. या पोस्टर अनावरण सोहळ्याच्या वेळी चित्रपटातील झिंगनांग चिंगनांग लै भारी गं... या प्रेमगीताची खास झलक कलाकारांनी सादरीकरणातून उपस्थितांना दाखविली. वैभव जोशी यांनी लिहिलेलं हे गाणं जयदीप वैद्य यांनी गायले आहे, तर संगीत आशुतोष कुलकर्णी यांचे आहे.



कान्स फेस्टिव्हलमध्ये ‘ऊत’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मलेशिया फिल्म फेस्टिव्हल, ईस्टर्न युरोप फिल्म फेस्टिव्हल, ईस्ट विलेज न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल, सिनसिने फिल्म फेस्टिव्हल, श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, मँचेस्टर फिल्म फेस्टिव्हल, अहमदाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल या सारख्या अनेक देशी-विदेशी चित्रपट महोत्सवात ‘ऊत’ या मराठी चित्रपटाने आपली यशस्वी मोहोर उमटविली आहे.
Comments
Add Comment

सुपरस्टार अक्षय कुमारची संपत्ती किती ?

मुंबई : बॉलीवूड हे स्वप्नांचे शहर आहे, जिथे मेहनत, चिकाटी आणि अभिनयाच्या जोरावर सामान्य माणूसही सुपरस्टार बनू

अभिनेत्री प्रिया मराठेचे कर्करोगामुळे ३८ व्या वर्षी निधन

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री प्रिया मराठेचे कर्करोगामुळे ३८ व्या वर्षी निधन झाले. कर्करोगाचे निदान

हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाहच्या आयुष्यात झाली 'ती'ची एन्ट्री

मुंबई : गणेशोत्सव सुरू आहे. सर्वत्र उत्साहाचे, आनंदाचे, जल्लोषाचे वातावरण दिसत आहे. अनेकांनी त्यांच्या नव्या

‘जॉली एलएलबी ३’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात

बॉलीवूड स्टार अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या ‘जॉली एलएलबी ३’ या चित्रपटाचा वाद वाढतच चालला आहे. जॉली एलएलबी

गणरायाच्या आगमनाचा ‘कुली’ चित्रपटाला फायदा

सध्या बॉक्स ऑफिसवर फक्त तीन चित्रपट उत्तम कमाई करत आहेत. एकीकडे ‘कुली’ आणि ‘वॉर २’ हे दोन मोठे चित्रपट चांगली

पार्थ पवार-जॅकलिन जोडीने घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

मुंबईत ठिकठिकाणी गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी अनेक सेलिब्रिटींनी विविध