Saturday, October 18, 2025
Happy Diwali

Local train: लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकल्याने प्रवाशाचा मृत्यू

Local train: लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकल्याने प्रवाशाचा मृत्यू
मुंबई: मुंबईच्या घाटकोपर रेल्वे स्थानकात एक दुर्देवी घटना घडली आहे. येथील लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत एक प्रवासी अडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुरूवातीला हा प्रवासी चालत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न करत असताना फटीत अडकून मृत्यू झाल्याचे सांगितले जात होते. मात्र या घटनेची सत्यता समोर आली आहे. संजय जगजप्पा मातंगे असं या प्रवाशाचं नाव आहे. संजय हे स्थानकात रेल्वेची वाट पाहत होते. यावेळी अचानक त्यांना चक्कर आली आणि ते लोकलवर आदळले. यातच ते लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकले. त्यांना तातडीने पोलिसांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले मात्र ते अंत्यवस्थ अवस्थेत होते. त्यांच्या छातीवर दाब देत पंपिंगही करण्यात आले मात्र त्यांची हालचाल होत नव्हती. पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृ्त्यू झाला होता.
Comments
Add Comment