Israel Iran Attack : इस्त्रायलने इराणवर केला मोठा हल्ला, अणुकेंद्रांना केले लक्ष्य

नवी दिल्ली: इस्त्रायलने इराणवर मोठा हल्ला केला आहे. इस्त्रायलच्या सैन्याने इराणची राजधानी तेहरानमध्ये बॉम्बेच्या सहाय्याने हल्ला केला आहे. याशिवाय इस्त्रायलने इराणच्या लष्करी ठिकाणांना तसेच त्यांच्या अणुकेंद्रांनाही लक्ष्य केले आहे.


इस्त्रायलने शुक्रवारी सकाळी दिलेल्या माहितीत म्हटले की त्यांनी इराणवर हल्ला केला आहे. इराणी मीडियाच्या माहितीनुसार, तेहरानमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले. इस्त्रायलच्या माहितीनुसार तेहरानमध्ये मिसाईल आणि ड्रोन हल्ल्याच्या शक्यतेमुळे तेथे आणीबाणी घोषित केली जाऊ शकते. इस्त्रायलच्या लष्कर अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार इस्त्रायलने इराणमधील सैन्य ठिकाणे तसेच अणुकेद्रांवर हल्ला केला आहे.


इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या माहितीनुसार, इस्त्रायलने इराणसाठी अणुबॉम्ब बनवणाऱ्या शास्त्रज्ञांवरही हल्ला केला आहे. ते पुढे म्हणाले, आम्ही नतांजमध्ये इराणचे मुख्य न्यूक्लियर प्लांटला लक्ष्य केले. येथे इराणी बॉम्ब बनवण्याचे काम करत होते.


नेतन्याहू यांनी या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचेही आभार मानले आहेत. ते म्हणाले, मी राष्ट्रपती ट्रम्प यांचे नेतृत्व आणि इराणच्या अणु कार्यक्रमाचा सामना करण्यासाठी आभार मानतो.

Comments
Add Comment

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात १८ जणांचा मृत्यू

काठमांडू(वृत्तसंस्था): नेपाळमधील कोशी प्रांतात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या

इस्त्रायलचा गाझावर हल्ला, ६ ठार

गाझा : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा पट्टीत शांतता नांदावी म्हणून गाझा पीस प्लॅनची घोषणा

सुदानमध्ये ७७ लाख लोक करतायत उपासमारीचा सामना, लाखो मुलांना कुपोषणाचा धोका

सुदान (वृत्तसंस्था) : जगातील सर्वात गरीब देश दक्षिण सुदान सध्या भयंकर संकटाचा सामना करत आहेत. तेथे आलेल्या

'या' तारखेपासून विंडोज १०चा सपोर्ट होणार बंद

वॉशिंग्टन डीसी :  टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. जगभरात मोठ्या

अमेरिकेच्या गाझा शांतता योजनेशी हमास सहमत

वॉशिंग्टन : पॅलेस्टिनी मिलिशिया गट हमासने अमेरिकेच्या गाझा शांतता प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे. शांतता

सरकारी निधी थांबल्यामुळे नासातही शटडाऊन

वॉशिंग्टन : अमेरिकेते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर उच्च टॅरिफ लावले असताना, त्यांच्या