Gold Silver Price: सोन्याचे दर जूनमध्ये नव्या 'शिखरावर' सोने १०१४०० रुपयांवर तर चांदीची महागली 'ही'आहेत कारणे !

  59

प्रतिनिधी: सकाळी शेअर बाजार कोसळल्यानंतर भारतीयांना आणखी एक धक्का मिळाला आहे.सोन्याने भाव गगनाला भिडले असून सोन्याने रेकॉर्डब्रेक वाढ केली आहे.सलग तिसऱ्यांदा सोन्याचे दर वधारल्याने जून महिन्यात सोन्याने नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याची प्रति ग्रॅम किंमत २१२ रूपयांनी वाढली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम किंमत १०१४० रूपये झाली आहे. तर २४ कॅरेट प्रति तोळा किंमत १०१४०० रूपयांवर पोहोचली आहे.

२२ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत १९५ रूपयांनी वाढत किंमत ९२९५ पातळीवर पोहोचली आहे. तर २२ कॅरेट प्रति तोळा किंमत ९२९५० रुपये पातळीवर पोहोचली आहे.१८ कॅरेट सोने प्रति ग्रॅम किंमत १५९ रूपयांनी वाढत ७६०५ रूपयांवर पोहोचले आहेत.तर १८ कॅरेट प्रति तोळा किंमत ७६०५० रुपये पातळीवर पोहोचला आहे.मुंबई,पुण्यात सोन्याचे दर २४ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत १०१४० रुपयांवर आहेत. सराफा बाजारातील सोन्याच्या मागणीतही घट होण्याची शक्यता आहे.

भारतीय कमोडिटी बाजार म्हणजेच एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) मध्ये सोन्याच्या निर्देशांकात १.७६% वाढ झाल्याने सोन्याचे एमसीएक्स दर १००१२६.०० पातळीवर पोहोचला आहे.तर एमसीएक्सवरील गोल्ड फ्युचर (गोल्ड Future Index) मध्ये तर १.७६% वाढ झाली आहे. जागतिक युएस गोल्ड फ्युचर (Us Gold Future Index) मध्ये १.२५% वाढ झाली आहे. डॉलर निर्देशांकातही सकाळपर्यंत ०.३९% वाढ झाली होती.

आज चांदीच्या दरातही वाढ !

चांदीच्या दरात प्रति ग्रॅम १.१० रूपये वाढ झाली आहे.तर प्रति किलोमागे ११०० रूपये वाढल्याने १ किलो चांदी ११०००० रूपयांवर पोहोचली आहे.मुंबईसह पुण्यातही चांदीची किंमत प्रति किलो ११०००० रूपये कायम आहे. एमसीएक्सवरील निर्देशांकात चांदीच्या निर्देशांकात ०.५९% वाढ झाल्याने चांदीची पातळी १०६५१० रूपयांवर पोहोचली आहे.

का वाढत आहे सोने चांदी?

आंतरराष्ट्रीय बाजारातील दबावात वाढ झाली आहे. सोनेचांदीला पुरवठ्याहून प्रचंड प्रमाणात मागणीत वाढ झाल्याने बाजारातील सोन्याचांदीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. अमेरिकन शेअर बाजारा कोसळल्यानंतर भारतासह आशियाई बाजारातही त्याचे पडसाद उमटले होते. इस्त्राईलने इराणवर हल्ला केल्यानंतर तेलाच्या किंमतीत वाढ झाली होती.आर्थिक संकेतांमुळे कच्च्या तेलाच्या किमती १.९७% ने वाढून ५,८४४ रुपयांवर स्थिरावल्या. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्य पूर्वेतील अमेरिकन कर्मचाऱ्यांच्या पुनर्स्थापनेबाबत केलेल्या वक्तव्यानंतर तेलात वाढ झाली. ज्यामुळे इराणसोबत वाढत्या तणावामुळे अमेरिकेला पुरवठा खंडित होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे सोन्याच्या बाबतीतही इस्त्राईलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. पुरवठ्यावर ताण पडल्याने निर्देशांकात मोठी वाढ झाली होती.

याशिवाय अमेरिकन बाजारातील महागाई नियंत्रणात राहिल्याने व समाधानकारक बेरोजगारी दर व फेडरल दर कपातीची गुंतवणूकदारांना आशा या सगळ्या कारणांमुळे ही वाढ झाली आहे. चांदीतही औद्योगिक उत्पादनात व सोलार उद्योगातील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या मागणीमुळे व सोन्याच्या तुलनेत कमी दर असल्याने गुंतवणूकीचे साधन म्हणून चांदीचा पर्याय गुंतवणूकदार स्विकारत आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवर चांदीच्या निर्देशांकात शुक्रवारी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
Comments
Add Comment

दहशतवाद जगासाठी मोठा धोका : पंतप्रधान मोदी

बीजिंग : दहशतवादाला जगासाठी मोठा धोका असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ठणकावून सांगितले. चीनमधील

शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक!

नवी दिल्ली : शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी)उत्तीर्ण करणे आता शिक्षकांसाठी बंधनकारक आहे, असा मोठा निर्णय सोमवारी

'मुंबईला वेठीस धरू नका, आझाद मैदानव्यतिरिक्त रस्ते मोकळे करा'

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि आंदोलकांनी

कांदा खरेदी करूनही नाफेड' , एनसीसीएफने थकविले बळीराजाचे पैसे

नाशिक : राज्यामध्ये केंद्र सरकारच्या नाफेड आणि एनसीसीएफ या दोन संस्थांनी शेतकऱ्यांच्या कांदा खरेदी करून देखील

महिला वर्ल्ड कप खेळणारे संघ होणार करोडपती

दुबई : भारतात ३० सप्टेंबरपासून महिला वनडे विश्वचषक सुरु होत आहे. आयसीसीने या स्पर्धेसाठी बक्षीस रकमेची घोषणा

जगदीप धनखड यांनी राजीनाम्यानंतर ४० दिवसांनी सोडला सरकारी बंगला, आता कुठे राहणार ?

नवी दिल्ली : भारताचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर ४० दिवसांनी दिल्लीतला सरकारी