विविध मागण्यांसाठी लेखकांनी घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

मुंबई : मानाचि लेखक संघटना मराठी भाषेतील मालिका नाटक व चित्रपटांच्या हौशी व व्यावसायिक लेखकांची संघटना आहे. या संघटनेच्या शिष्टमंडळाने राज्याचे सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांची भेट घेतली. या भेटीत संघटनेच्यावतीने मंत्री शेलार यांना एक निवेदन देण्यात आले. लेखकांचे प्रश्न सोडवावे, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

नियोजनानुसार ९ जून २०२५ रोजी मालिका नाटक चित्रपट लेखक संघटनेचे पदाधिकारी, पुरुषोत्तम बेर्डे, राजीव जोशी, आशिष पाथरे, डॉ अलका नाईक आणि विवेक आपटे लेखकांच्या समस्यांसाठी सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांना भेटले. यावेळी चर्चा करू आणि लेखकांचे प्रश्न सोडवू, असे आश्वासन मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

लेखकांच्या प्रमुख मागण्या

१ लेखकाला सुचलेले नाटकाचे, चित्रपटाचे, किंवा मालिकेचे शीर्षक रजिस्टर करता यायला हवे.
२ कवितेतल्या / गीतातल्या / भावगीताच्या किंवा संवादाच्या ओळींची मालिका शिर्षके बनवातान संबंधित मूळ लेखक / कवी यांना श्रेय द्यावे तसेच संबंधितास त्याचे मानधनही (वन टाइम पेमेंट) द्यावे.
३ लेखकांच्या संघटनेला कार्यालयीन कामकाज आणि कार्यशाळा घेण्यासाठी शासनाने जागा द्यावी.
४ सेन्सॉर सर्टिफिकेट देण्यापूर्वी दिग्दर्शक, छाया लेखक, संगीतकार, संकलक व प्रमुख कलाकारांप्रमाणे लेखक तसेच गीतकार कडूनही त्यांचे पूर्ण मानधन मिळाल्याचे व सेन्सॉर सर्टिफिकेट देण्याला त्यांची हरकत नसल्याचे प्रमाणपत्र घ्यावे
५ कॉपीराईट व इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट चे रजिस्ट्रेशन दिल्ली बरोबरच मुंबईतही करता येण्याची सोय हवी.
६ वृद्ध विकलांग लेखकांसाठी समूह विमा आणि निवृत्ती वेतन योजना
Comments
Add Comment

रफी पुरस्कार माझ्यासाठी देवाचा प्रसाद

जेष्ठ गायिका उत्तरा केळकर मुंबई : महान गायक मोहम्मद रफी यांच्या नावाने मला मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी

'वेलकम ३'चे शूटिंग संपले , वेगवेगळ्या लूक मध्ये दिसणार अक्षय कुमार

Welcome 3 : बॉलिवूडच्या वेलकम ३ या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच संपले आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार एक महत्त्वाची

लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाचा मोठा निर्णय

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

सणाचा खरा आनंद लुटत जॅकलिनने साजरा केला ख्रिसमस!

मुंबई: देशभरात सर्वत्र ख्रिसमसची तयारी सुरू असून बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने सणाचा खरा उत्साह आणि

अल्लू अर्जुन–त्रिविक्रम यांची ग्रँड कमबॅक, मायथॉलॉजिकल एपिकमध्ये हिट जोडी पुन्हा एकत्र

१000 कोटींच्या महाप्रकल्पात अल्लू अर्जुन आणि त्रिविक्रम यांच्या रीयुनियनची तयारी आपण अशा एका मोठ्या बातमीबद्दल