माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे विमान अपघातात निधन

  121

अहमदाबाद : गुजरातच्या राजकीय इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावलेले माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे एअर इंडियाच्या विमान अपघातात निधन झाल्याची दु:खद घटना गुरुवारी घडली. अहमदाबाद विमानतळावरून लंडनकडे निघालेल्या फ्लाइट AI-171 या बोईंग ७८७-७ ड्रीमलाइनरने दुपारी १.३० वाजता टेकऑफ केल्यानंतर अवघ्या काही क्षणांतच मेघानीनगर भागात कोसळले.


या विमानात एकूण २४२ प्रवासी होते, त्यामध्ये २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते. दुसऱ्या रांगेत बसलेले विजय रुपाणी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले, अशी माहिती खासदार परिमल नाथवानी यांनी दिली. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे.



विजय रुपाणी आपल्या पत्नी अंजली यांना लंडनहून परत आणण्यासाठी प्रवास करत होते. मात्र, नियतीने वेगळाच खेळ खेळला. त्यांच्या पत्नी लंडनमध्ये असून या दु:खद बातमीने त्यांच्यावर आभाळ कोसळल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.


अपघाताचे कारण इंजिन बिघाड किंवा टेकऑफदरम्यान मागच्या भागाने झाडाला धडक झाल्याने अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


विजय रुपाणी यांचा जन्म म्यानमारच्या यांगॉन येथे २ ऑगस्ट १९५६ रोजी झाला. लहानपणीच त्यांचे कुटुंब राजकोटमध्ये स्थलांतरित झाले. एबीव्हीपी पासून संघ परिवाराशी त्यांचा संबंध सुरू झाला आणि पुढे त्यांनी भारतीय जनता पक्षात विविध जबाबदाऱ्या सांभाळत २०१६ ते २०२१ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले.


गुजरातने केवळ एक राजकारणी नाही, तर एक प्रामाणिक, संयमी आणि कर्तव्यनिष्ठ नेतृत्व गमावले आहे.

Comments
Add Comment

FASTag वार्षिक पासला प्रचंड प्रतिसाद, पहिल्याच दिवशी १.४ लाख पासची बुकिंग

नवी दिल्ली: राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या FASTag वार्षिक पासला पहिल्याच दिवशी

नागालँडचे राज्यपाल ला. गणेशन यांचे निधन

चेन्नई: नागालँडचे राज्यपाल ला. गणेशन (L.A. Ganesan) यांचे शुक्रवारी (१५ ऑगस्ट, २०२५) रात्री चेन्नई येथील रुग्णालयात निधन

Accident news: स्वातंत्र्यदिनी मोठा बस अपघात! १० जणांचा जागीच मृत्यू, ३५ प्रवासी जखमी

बर्दवान: देशात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना पश्चिम बंगालच्या पूर्व बर्दवान जिल्ह्यातून

दिल्ली : हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळून ५ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दिल्लीतील निजामुद्दीन भागात असलेल्या हुमायूं मकबऱ्यामध्ये भिंत कोसळल्याची

IIT Hyderabad AI Driverless Bus : भारताचा टेक्नॉलॉजी चमत्कार! IIT हैदराबादमध्ये ड्रायव्हरविना बस, १० हजार प्रवाशांनी घेतला भन्नाट अनुभव

हैदराबाद : हैदराबादच्या भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT Hyderabad) ने तंत्रज्ञानाच्या नव्या पर्वाची सुरुवात करत देशातील

Bengluru Blast: बेंगळुरूमध्ये स्फोट! १० वर्षीय मुलाचा मृत्यू , तर १२ जण जखमी

बेंगळुरू: शुक्रवारी बेंगळुरूमधील विल्सन गार्डनच्या चिन्मयनपाल्य भागात झालेल्या सिलेंडर स्फोटात एका १० वर्षीय