‘द बंगाल फाइल्स’ चा टीझर प्रदर्शित

मुंबई : स्पष्टवक्तेपणासाठी आणि विचार प्रवर्तक सिनेमांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री आता घेऊन येत आहेत त्यांचा पुढील चित्रपट ‘द बंगाल फाइल्स: राईट टू लाईफ’. याआधी त्यांनी ‘द ताशकंद फाइल्स’ आणि ‘द काश्मीर फाइल्स’ सारखे चित्रपट प्रेक्षकांसमोर आणले आहेत.

‘द बंगाल फाइल्स: राईट टू लाईफ’ ही फिल्म पूर्वी 'द दिल्ली फाइल्स’ या नावाने ओळखली जात होती, पण आता तिचे नाव बदलून ‘द बंगाल फाइल्स’ ठेवण्यात आले आहे आणि आता जेव्हा या चित्रपटाचा अधिकृत टीझर प्रदर्शित झाला आहे, तेव्हा प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

टीझरमध्ये देशाच्या इतिहासातील एक भीतीदायक बाजू पुन्हा एकदा समोर येतोय. प्रभावशाली व्हिज्युअल्स आणि भावना यांनी भरलेली ही झलक सांगून जाते की, हा चित्रपट अत्यंत परिणामकारक आणि अंतःकरणाला भिडणारा असणार आहे.



अभिषेक अग्रवाल आणि पल्लवी जोशी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार हे कलाकार यात झळकणार आहेत. टीझरमध्ये दाखवलेले दृश्य प्रेक्षकांना अस्वस्थ करणारे आहे, जे या कथानकाच्या खोलीची आणि वास्तवतेची झलक देते.

‘द बंगाल फाइल्स’ या चित्रपटाची कथा विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलेली असून, याची निर्मिती अभिषेक अग्रवाल आणि पल्लवी जोशी यांनी केली आहे. हा चित्रपट आई एम बुद्धा प्रोडक्शन्स आणि तेज नारायण अग्रवाल यांच्या सादरीकरणात बनवण्यात आला आहे आणि ‘फाइल्स ट्रिलॉजी’ चा हा शेवटचा भाग असेल, ज्यामध्ये आधीचे ‘द ताशकंद फाइल्स’ आणि ‘द काश्मीर फाइल्स’ समाविष्ट आहेत. हा चित्रपट ५ सप्टेंबर २०२५ रोजी संपूर्ण भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 
Comments
Add Comment

सुपरस्टार अक्षय कुमारची संपत्ती किती ?

मुंबई : बॉलीवूड हे स्वप्नांचे शहर आहे, जिथे मेहनत, चिकाटी आणि अभिनयाच्या जोरावर सामान्य माणूसही सुपरस्टार बनू

अभिनेत्री प्रिया मराठेचे कर्करोगामुळे ३८ व्या वर्षी निधन

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री प्रिया मराठेचे कर्करोगामुळे ३८ व्या वर्षी निधन झाले. कर्करोगाचे निदान

हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाहच्या आयुष्यात झाली 'ती'ची एन्ट्री

मुंबई : गणेशोत्सव सुरू आहे. सर्वत्र उत्साहाचे, आनंदाचे, जल्लोषाचे वातावरण दिसत आहे. अनेकांनी त्यांच्या नव्या

‘जॉली एलएलबी ३’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात

बॉलीवूड स्टार अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या ‘जॉली एलएलबी ३’ या चित्रपटाचा वाद वाढतच चालला आहे. जॉली एलएलबी

गणरायाच्या आगमनाचा ‘कुली’ चित्रपटाला फायदा

सध्या बॉक्स ऑफिसवर फक्त तीन चित्रपट उत्तम कमाई करत आहेत. एकीकडे ‘कुली’ आणि ‘वॉर २’ हे दोन मोठे चित्रपट चांगली

पार्थ पवार-जॅकलिन जोडीने घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

मुंबईत ठिकठिकाणी गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी अनेक सेलिब्रिटींनी विविध