मुंबई : स्पष्टवक्तेपणासाठी आणि विचार प्रवर्तक सिनेमांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री आता घेऊन येत आहेत त्यांचा पुढील चित्रपट ‘द बंगाल फाइल्स: राईट टू लाईफ’. याआधी त्यांनी ‘द ताशकंद फाइल्स’ आणि ‘द काश्मीर फाइल्स’ सारखे चित्रपट प्रेक्षकांसमोर आणले आहेत.
‘द बंगाल फाइल्स: राईट टू लाईफ’ ही फिल्म पूर्वी 'द दिल्ली फाइल्स’ या नावाने ओळखली जात होती, पण आता तिचे नाव बदलून ‘द बंगाल फाइल्स’ ठेवण्यात आले आहे आणि आता जेव्हा या चित्रपटाचा अधिकृत टीझर प्रदर्शित झाला आहे, तेव्हा प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
टीझरमध्ये देशाच्या इतिहासातील एक भीतीदायक बाजू पुन्हा एकदा समोर येतोय. प्रभावशाली व्हिज्युअल्स आणि भावना यांनी भरलेली ही झलक सांगून जाते की, हा चित्रपट अत्यंत परिणामकारक आणि अंतःकरणाला भिडणारा असणार आहे.
अभिषेक अग्रवाल आणि पल्लवी जोशी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार हे कलाकार यात झळकणार आहेत. टीझरमध्ये दाखवलेले दृश्य प्रेक्षकांना अस्वस्थ करणारे आहे, जे या कथानकाच्या खोलीची आणि वास्तवतेची झलक देते.
‘द बंगाल फाइल्स’ या चित्रपटाची कथा विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलेली असून, याची निर्मिती अभिषेक अग्रवाल आणि पल्लवी जोशी यांनी केली आहे. हा चित्रपट आई एम बुद्धा प्रोडक्शन्स आणि तेज नारायण अग्रवाल यांच्या सादरीकरणात बनवण्यात आला आहे आणि ‘फाइल्स ट्रिलॉजी’ चा हा शेवटचा भाग असेल, ज्यामध्ये आधीचे ‘द ताशकंद फाइल्स’ आणि ‘द काश्मीर फाइल्स’ समाविष्ट आहेत. हा चित्रपट ५ सप्टेंबर २०२५ रोजी संपूर्ण भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.