Sunday, October 26, 2025
Happy Diwali

महापालिकेची 'व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट' कार्यप्रणाली सेवेत

महापालिकेची 'व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट' कार्यप्रणाली सेवेत

मुंबईतील रस्त्यावरील खड्यांची होणार जलद गतीने दुरुस्ती

मुंबई (खास प्रतिनिधी): जोरदार सततच्या पावसामुळे मुंबई महानगरातील रस्त्यांवर होणाऱ्या खड्यांची जलद गतीने दुरुस्ती करण्यासाठी मुंबई महापालिकेने 'पॉटहोल विवकफिक्स' मोबाईल अ‍ॅप आणि व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट (८९९९२२८९९९) सेवा सुरू केली आहे. 'पॉटहोल क्विकफिक्स' मोबाईल अ‍ॅप ९ जून पासून नागरिकांसाठी कार्यान्वित करण्यात आला आहे. रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती प्रक्रियेत नागरी सहभाग वाढविणे आणि नागरिकांना खट्टयांबाबतच्या तक्रार करण्याची प्रक्रिया सुलभकरणे, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे.

अ‍ॅप्लिकेशन ओपन केल्यानंतर तक्रार यशस्वीपणे नोंदविण्याची प्रक्रिया केवळ ५ पेक्षा कमी क्लीकमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे अ‍ॅप अ‍ॅण्ड्रॉईड आणि आय.ओ.एस. या दोन्ही प्रणालीवर उपलब्ध आहे. 'पॉटहोल क्विकफिक्स' हे मोबाईल अॅप वापरकों स्नेही आहे. या अ‍ॅपद्वारे नागरिकांना खड्यांचे छायाचित्र, स्थान आणि माहिती अपलोड करून तक्रार नोंदवण्याची सोपी व जलद सुविधा प्राप्त झाली आहे. मोवाईल अॅपद्वारे करण्यात आलेली तक्रार संबंधित विभागाकडे थेट पोहोचते आणि खड्डे दुरुस्ती प्रक्रिया तातडीने सुरू होते. महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते हे अ‍ॅप ९ जूनपासून सुरू करण्यात आले आहे.

मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते व वाहतूक विभागाने रस्ते विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेतली आहेत. त्याचप्रमाणे, पावसाळ्यात रस्त्यांवर आढळणारे खड्ढे भरणे / रस्ते दुरुस्तीचे नियोजनही केले आहे. रस्त्यांवर आढळणारे खड़े तसेच दुरुस्तीयोग्य रस्त्यांसाठी महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) विभागाने 'पॉटहोल विवकफिक्स' हे अ‍ॅप विकसित केले आहे. हे अ‍ॅप नागरिकांना एक सुलभव सुसंगत डिजिटल पर्याय प्रदान करते, ज्यामध्ये खड्ड्र्धांचे छायाचित्र, स्थान आणि वर्णन अपलोड करून तक्रार त्वरित नोंदवता येते.

नोंदवलेली तक्रार संबंधित विभाग कार्यालयाकडे स्वयंचलित पद्धतीने पोहोचते, ज्यामुळे महापालिकेच्या अभियंत्यांना तात्काळ कार्यवाही करता येते. या अ‍ॅपमध्ये स्थाननिहाय तक्रार नोंदणी, छायाचित्र व स्थान टॅगिंग, तक्रारीच्या स्थितीचा मागोवा, दुरुस्तीची अपेक्षित वेळ आणि काम पूर्ण झाल्यानंतर अभिप्राय देण्याची सुविधा उपलब्ध आहे. नागरिकांच्या सहभागातून रस्ते अधिक सुरक्षित करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. त्यात काही त्रुटी आढळल्पास तक्रार नोंदविण्यासाठी महापालिकेने अ‍ॅप आणि व्हॉट्सअ‍ॅप चॅटवॉट हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. महापालिकेने जर विहित कालावधीत व परिणामकारपणे तक्रारीचे निवारण केले तर नागरिक अधिक प्रतिसाद देण्याकामी उच्चुक्त होतील, याची जाणीव ठेवून ही संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment